तिसऱ्या दिवशी तुंमगाव वाश्याची गावबंदी मागे.लघु पाटबंधारे विभागाची चूक गावकऱ्यांनी लक्षात आणून दिली.

तिसऱ्या दिवशी तुंमगाव वाश्याची गावबंदी मागे.

लघु पाटबंधारे विभागाची चूक गावकऱ्यांनी लक्षात आणून दिली.

रस्त्या व इतर कामासाठी दहा लक्ष देण्याचे आश्वासन.

येत्या पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय.

वरोरा 17/2/24
चेतन लुतडे

वरोरा तालुक्यातील तूमगाव गावामध्ये  गावबंदी करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसापासून गावकऱ्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांना व मदतीला धुडकावून लावले होते. शाळा ,ग्रामपंचायत ,कार्यालय व इतर शासनाचे कर्मचारी यांना गावामध्ये येण्यास बंदी करण्यात आली होती. यासंदर्भाच्या निर्णय ग्रामसभेने आपल्या ठरावात नमूद केला होता. यामध्ये सरपंचासह सदस्यांनी हा ठराव घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. 
पहिल्यांदा ग्रामसभेचा या पद्धतीचा निर्णय पाहून चक्क  वरिष्ठ शासकीय अधिकारी बुचकाळ्यात पडले होते. हे प्रकरण प्रशासकीय अधिकाराच्या अंगलट येण्याच्या आधीच प्रशासकीय यंत्रणा सक्रिय होऊन आज शनिवारी गावकऱ्यांना समजावून तहसीलदारांनी मध्यस्थी करत गावबंदी वापस घेण्याचे आव्हान केले होते. 
तुमगाव येथील उपरोक्त संदर्भिय निवेदनाच्या अनुषंगाने दिनांक 17/02/2024 रोजी मौजा तुमगांव येथे संयुक्त भेट दिली असता, गावातील गांवक-यांनी मोजा उमरी (तुमगांव) येथील लघुपाटबंधारे तलावाबाबत  तक्रारी उपस्थित केलेल्या होत्या. त्यामध्ये सदर पाझर तलावाचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करुन मिळणे तसेच तलावाखालील शेतीचे अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरीता उपाययोजना करण्याची मागणी गांवक-यांमार्फत करण्यात आली होती.

मोजा उमरी (तुमगांव) येथील कामाचे करारनामा दिनांक 15/03/2007 अन्वये तलावाच्या बांधकामास मार्च 2007 पासून सुरुवात करण्यात आलेली असुन विभागाच्या विविध तांत्रीक अडचणीमुळे काम थांबलेले असल्याचे नमूद केले आहे. सदर काम पूर्ण होण्याच्या अनुषंगाने मा. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपूर यांच्या मार्फतीने चार सदस्यीय तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून पथकामार्फत प्रकल्प पाहणी करण्यात आलेली आहे. तरी गांवबंदी आंदोलनाच्या अनुषंगाने सदर तपासणी अहवालावरती लवकरात लवकर निर्णय घेवून या कार्यालयाला योग्य निर्देश  देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास विनंती करण्यात आली आहे. अशे मत या सदस्यांनी नोंदविले आहे.
 तसेच मौजा उमरी (तुमगांव) येथील लघुपाटबंधारे तलावाचे उर्वरीत काम पूर्ण करण्याकरीता वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा करण्यात येईल व सदर काम पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल. अशा आशयाचे पत्र सरपंच व समस्त गावकऱ्यांना देण्यात आल्याने तिसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी गावबंदी निर्णय मागे घेण्यात आला.
मात्र येत्या पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि.प. (ल.पा.) उपविभाग, भद्रावती यांनी यासंदर्भातील प्रतिलिपी
1) मा. जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना माहितीस तथा उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.
2) मा. तहसिलदार, वरोरा यांना माहितीकरीता सादर.
3) डॉ. विवेक तेला, रा. तुमगांव यांना माहितीकरीता अग्रेषित.
दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यात रस्त्याचे काम व नाल्याचे काम करण्यात येणार असून पहिल्यांदा अशा प्रकारे गावकऱ्यांच्या हक्काचे काम गावकऱ्यांनी प्रशासनाकडून करून घेतले आहे. 


  
 यावेळी तुमगाव येथे तहसीलदार योगेश कोटकर, नायब तहसीलदार  काळे, प्रभारी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम  उपविभाग चंद्रपूर,  अरुण झाडे, जलसंधारण विभाग भद्रावती चे अभियंता  नितीन काकडे , रंजीत रामटेके , तूमगाव सरपंच सौ.दुर्गा तोडासे , ग्राम पंचायत सदस्य सौ. सुषमा पाखमोडे ,  शेतकरी समर्थक डॉ.विवेक तेला , तुमगाव मधील ग्रामस्थ  उपस्थित होते.



Comments