माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार तात्काळ आरोग्य सेवा,स्वच्छता आणि कर्मचारी यांची वर्तन ठीक करा अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून सुरळीत करणार:- अभिजित कुडे विधानसभा प्रमुख युवासेना
तात्काळ आरोग्य सेवा,स्वच्छता आणि कर्मचारी यांची वर्तन ठीक करा अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून सुरळीत करणाऱ
वरोरा:- तालुक्यातील माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार सुरू. कुटुंब नियोजन साठी गेलेल्या महिलांची अभिजित कुडे याना तक्रार येताच अभिजित कुडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून घेतली अधिकाऱ्यांची भेट. प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता नाही जिथे रुग्ण त्यांची छोटी छोटी मुल आहे तिथे केर कचरा साठून, 2 ,2 दिवस साफ सफाई करण्यात येत नाही. रुग्णांशी गैरव्यवहार केला जातो. कुटुंब नियोजन साठी आलेल्या महिलांची पूर्ण तपासणी न करता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामधे 5 मधून 2 महिलांची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली यासाठी आरोग्य अधिकारी जबाबदारी असल्यास आरोप त्यांच्या नातेवाईकांनी आणि सर्व महिलांनी केला आहे. तात्काळ विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांनी विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व सर्व वस्तुस्थिती बघितली तर तिथे अस्वच्छता दिसली रुग्णांच्या समस्या समजून घेतल्या व त्यानंतर आरोग्य अधिकारी यांची कानउघाडणी केली. तात्काळ साफ सफाई करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात इतकी बेकार अवस्था बघुन तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी बोरकर यांना कॉल करून सर्व बाब लक्षात आणून दिली व रुग्णाशी त्यांचे बोलणे करून दिले त्यांनी सर्व प्रकार संतापजनक असून यावर कारवाई करणार असे सांगितले पण या नंतर असा प्रकार निदर्शनास आल्यास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, चंद्रपुर जिल्हा युवासेनाप्रमुख रोहण कुटेमाटे व वरोरा युवासेना तालुका प्रमुख विक्की तावाडे यांचे मार्गदर्शनात आपल्या पद्धतीने आरोग्य केंद्र सरळ करणार असा इशारा अभिजित कुडे युवासेना विधानसभाप्रमुख यांनी दिला. महिलांची अभिजित कुडे याना तक्रार केली त्यानंतर सर्व शहानिशा करून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. औषधी साठा उपलब्ध नाही कर्मचारी रुग्णांची गैरव्यवहार करतात यावर अंकुश लावावा अन्यथा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार आरोग्य अधिकारी असणार. सर्व सामान्य माणूस गरीब रुग्णांना सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हेच साधन आहे पण त्यामधे त्यांच्या आरोग्याशी खेळ होत खपवून घेणार नाही
Comments
Post a Comment