वरोरा येथे ओबीसी, व्ही . जे एन टी.एसबीसीअनुसुचित जाती जमाती संयुक्त महामोर्चा ची सभा संपन्न.

*वरोरा येथे ओबीसी, व्ही . जे एन टी.एसबीसीअनुसुचित जाती जमाती संयुक्त महामोर्चा ची सभा संपन्न.*
================

वरोरा— चंद्रपूर येथे दि.7 फरवरी 24 ला होणा-या ओबीसी,व्ही.जे.एन.टी.एस.बी.सी,अनु.जाती,अनु.जमाती या बहुजन समाजाचा महामोर्चा गांधी चौक चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्च्याचे आयोजन केलेले आहे.त्या अनुशंगाने दि.3/2/24 ला कटारिया मंगल कार्यालय,वरोरा येथे वरील सर्व पदाधिकारी व बांधवांची सभा व तालुक्यातील कार्यरत सर्व पक्षांच्या पदाधिका-यांची संयुक्त सभा मान.श्रीमती प्रतिभाताई धानोरकर,आमदार वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक सन्मा.सचिन राजूरकर,महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रमुख अतिथी श्री.दिनेश पाटील चोखारे कार्याध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,श्री.कृष्णा मसराम जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास परिषद,चंद्रपूर,सर्व समाज पदाधिकारी श्री.गजानन बोढाले,श्री.जयंत ठाकरे,श्री.गजानन मेश्राम, श्री.नरेंद्र धांडे,श्री.रमेश मेश्राम,श्री,चक्रधर साठे,श्री.गजानन वांढरे,श्री.नगाजी साळवे,श्री.हरिभाऊ भाजीपाले,श्री.राजू डोंगरे,श्री.विलास खोंड,श्री.विजय आंबेकर,श्री.मुकेश जिवतोडे शिवसेना(उबाठा), श्री.विलासभाऊ नेरकर विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,श्री.सुरेश महाजन भारतीय जनता पक्ष,श्री.विनोद सोनटक्के मनसे,तथा श्री.शाम लेडे आयोजक यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक श्री.शाम लेडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी सदर महामोर्च्याची व शासन जीआर ची रुपरेषा सांगून सर्व वरील समाजांनी सदर आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यानंतर मुख्य मार्गदर्शक श्री.सचिनभाऊ राजूरकर यांनी 27/12/23 व 26/1/24शासन निर्णय व अध्यादेश उपस्थित सर्व समाज बांधवांना कसा अन्यायकारक आहे याची संपूर्ण माहिती दिली तसेच इतर समाज मान्यवरांनी सभेला संबोधित केले.
 सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर मॅडम यांनी वरील दोन्ही Gr ची माहिती देवून वरोरा क्षेत्रातून जास्तीत जास्त संख्येने सदर मोर्चास सहभागी होण्याचे आवाहन केले.सदर सभेत सर्व पक्ष प्रमुख पदाधिकारी कडून एकूण 70 गाड्या करुन जास्तीत जास्त लोकांना नेण्याचे सदर सभेत सर्वांनुमते ठरविण्यात आले.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक टिपले व आभार प्रदर्शन  श्री.राजूभाऊ हिवंज यांनी केले.
या सभेत बहुजन समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments