तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments