केपीसीएल कंपनीच्या लेखी पत्रानंतर बरांज आंदोलन कर्ता महिला खड्ड्याच्या बाहेर**आठ दिवस राहिल्या खुल्या कोळसा खाणीत*

*केपीसीएल कंपनीच्या लेखी पत्रानंतर बरांज आंदोलन कर्ता महिला खड्ड्याच्या बाहेर*

*आठ दिवस राहिल्या खुल्या कोळसा खाणीत*
अतुल कोल्हे भद्रावती -  
            केपीसीएल कंपनीच्या विरोधात आंदोलन कर्ता महिला दिनांक 9 फेब्रुवारीला खुला कोळसा खाणीच्या खड्ड्यात उतरल्या आपल्या मागण्यावर ठाम राहून त्या तब्बल आठ दिवसानंतर केपीसीएल कंपनीने लेखी पत्र दिल्यानंतर त्या खड्ड्याच्या बाहेर निघाल्या मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे .
 बरांज प्रकल्पग्रस्त महिलांच्या आंदोलनाचा आजचा ६८ वा दिवस आहे खड्ड्यातील आंदोलनाचा आठवा दिवस होता दिनांक 14 फेब्रुवारीला जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयात बैठक झाली त्यामध्ये आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सक्त निर्देश दिले .
त्यानंतर केपीसीएल कंपनीने पुनर्वसन टीम गठीत केलेली आहे सदर टीम पुनर्वसनस्थळी कॅम्प करून लवकरात लवकर पुनर्वसनाची प्रक्रिया करेल असे लेखी आश्वासनाचे पत्र कंपनीच्या वतीने त्या दहा आंदोलन करत्यांना देण्यात आले यावेळी कंपनीचे अधिकारी, ठाणेदार बिपिन इंगळे, महिलांच्या वतीने विनोद खोब्रागडे आदी उपस्थित होते .
 [पंचशीला कांबळे, माधुरी वाढई , पल्लवी कोरडे, माधुरी निखाडे , रंजना शेरके, सरस्वती मेश्राम, मंजू कुळसंगे, माया कोवे या दहा महिला खुल्या कोळसा खाणीच्या खड्ड्यात उतरून आंदोलन करत होत्या. 

Comments