कुचणा येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे हळदीकुंकु व वाणवाटप**विधानसभा क्षेत्रातील हळदी-कुंकु उपक्रम श्रृंखलेतील नववा कार्यक्रम**विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम*
*विधानसभा क्षेत्रातील हळदी-कुंकु उपक्रम श्रृंखलेतील नववा कार्यक्रम*
*विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम*
भद्रावती :
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात दिनांक 25 जाने. ते 8 फेब्रु. पर्यंत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांकरीता हळदी-कुंकु, वाण तसेच महिला स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच श्रृंखलेतील दहावा कार्यक्रम भद्रावती तालुक्यातील कुचणा येथे आज (दि. 02) ला माजरी-पाटाळा जिल्हा परीषद क्षेत्रातील महिला तसेच विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परीषद क्षेत्रातील माजरी कुचणा,पाटाळा, राळेगाव, मनगाव , थोराणा , नवीन कावळी , नायलोन,पळसगाव येथील महिला मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या रश्मीताई ठाकरे यांच्यासूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून, चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक तथा माजी नगरसेवक शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांचे निरीक्षणात, पुर्व विदर्भ सघंटीका तथा प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवासेना जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे, युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांचे सहभागाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा व चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे या हेतूने हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले तसेच महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करीत महापुरुषांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमास मंचावर भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल ,विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंचावर उपस्थित मान्यवरांसोबतच प्रमुख पाहुणे तालुका प्रमुख नंदू पढाल, युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, माजी नगरसेवीका सुष्माताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सुचिता ताजणे (सरपंच कुचणा) , प्रा. माहेश्वरी निंबाळकर अध्यक्ष महिला मंडळ कुचणा, अश्विनी निमकर सचिव महिला मंडळ कुचणा , रवी भोगे उप तालुका प्रमुख , प्रफुल्ल ताजणे
कार्यक्रमास युवासेना विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे , मनोहर आगलावे तालुका समन्वयक, कान्होबाजी तिखट प.स. संघटक, बंडुभाउ मांढरे विभाग प्रमुख, बबन बदकी, रविकिरण इंगोले, मधुकरराव महातळे, बाळू वानखेडे, सुदाम ठक ,प्रमुख पाहुणे तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, गणमाण्य प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता आशाताई ताजणे तालुका संघटीका, मायाताई टेकाम, शहर संघटीका , शीलाताई आगलावे, नेहा बनसोड, कल्पना जुनघरी, मनीषा वैध, विद्या चोपणे, चंदाताई वानखेडे, मायाताई आत्राम साधना खामनकर , ताराबाई तुराळे ,गुणाबाई पारखी, रेखा तुराणकर, कीरणताई कोल्हे ,भद्रावती महिला आघाडी , महिला आघाडी पदाधिकारी तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
जय दुर्गा कावळी ग्रुप, आम्ही जातीचे शेतकरी, फुले सावित्री नाटक, गोंडी ग्रुप, जिजामाता मंडळ कुचणा, आम्ही शिवकण्या, शिवम सीडाम, श्रेया मोहुर्ल, देवीका ताजणे, लावण्या महारतळे, प्रणाली पाचभाई,आरुशी कुंभारे, यांनी नृत्य, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले
प्रास्ताविक आशा ताजणे तालुका संघटीका यांनी तसेच कार्यक्रमाचे संचालन कीरण पोट तथा आभार प्रदर्शन सपना तीखट यांनी केले. हर्षोल्लासात घोडपेठ येथे हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा सफलतापुर्वक महिलांचा उपस्थितीत संपन्न झाले.
Comments
Post a Comment