व्यापारी लाईन मधील कचरा साफ होणार का?रोडवरच बाथरूमची व्यवस्था, पालिका प्रशासन निद्रावस्थेतकचरा साफ न झाल्यास व्यापारी संघटना टॅक्स भरणार नाही.

व्यापारी लाईन मधील कचरा साफ होणार का?
रोडवरच बाथरूमची व्यवस्था, पालिका प्रशासन निद्रावस्थेत

कचरा साफ न झाल्यास व्यापारी संघटना टॅक्स भरणार नाही.

चेतन लुतडे
वरोरा

 वरोरा (स) : धान्य बाजारातील घाण व दुर्गंधीमुळे व्यापारी व ग्राहक चांगलेच हैराण झाले आहेत.याला नागरिकांसोबतच धान्य मार्केट रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असून, याला नगरपालिकेचाही नियोजन व कामाचा अभाव कारणीभूत आहे.असा आरोप  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंभूनाथ वरघणे यांनी केले आहे. या परिसरातील गड व्यापारी व ग्राहक वर्षानुवर्षे या समस्येने त्रस्त असून कधी कधी दुर्गंधीमुळे दुकाने बंद करावी लागतात.याबाबत त्यांनी वारंवार नगरपालिकेला कळवले. समस्या सोडविण्याची विनंती केली. ही समस्या आधारस्तंभ माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही.

प्रशासनाला स्वच्छतेचे काही देणेघेणे नसून पालिका स्वच्छतेच्या नावाखाली दर महिन्याला लाखोंचा खर्च करत असल्याचे दिसते.  पालिका कर वसुली करते, तरीही धान्य मार्केट व वरोरा शहरातील अस्वच्छता त्यांना साफ करता येत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
व्यापारी संघटना एकवटली असून नगरपालिकेने व्यापारी लाईन  मधील कचरा साफ केला नाही तर  येणाऱ्या काळात व्यापारी  टॅक्स भरणा करनारा नाही असा तीव्र संताप व्यापारी संघटनेने जाहीर केला आहे.
या भागात दारूचे विक्री चे दोन ते तीन दुकान असल्याने दारू पिऊन येणारे व्यक्ती या ठिकाणी लघुशंका,सडास रोडच्या मधोमध करत असतात. त्यामुळे व्यापारी दुकानदारांना परिसरात नेहमी दुर्गंधी येत असते. या  परिसरात  पालिकेतर्फे कोणतीही व्यवस्था आतापर्यंत करण्यात आलेली नाही. 
नगरपालिकेच्या हद्दीतील ज्या जागा होत्या त्या जागेवरती अतिक्रमण करून असल्याने  ती वापस घेण्याची हिंमत पालिकेमध्ये नाही. त्यामुळे साधी बाथरूमची व्यवस्था सुद्धा पालिका अजून पर्यंत या परिसरात करू शकली नाही. आणि जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी साधारण माणूस बाथरूम साठी जाऊ शकत नाही. 
पण मात्र स्वच्छ भारत अभियान नावाखाली पालिका कागदपत्रे सादर करून शासनाचा निधी लाटत आहे. दोन वर्षापासून पालिकेत नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. 

असेच सुरू असल्यास जनतेचा आक्रोश नगरपालिकेला येत्या काळात सहन करावा लागणार आहे.
पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शंभू वरघने यांनी तीव्र संताप व्यक्त करत नगरपालिकेने आपले काम चोख करावे अशी तंबी त्यांनी दिली आहे.

Comments