महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेत सामावून घ्या. - आमदार प्रतिभाताई धानोरकर
महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेत सामावून घ्या. - आमदार प्रतिभाताई धानोरकर
मुंबई येथे महानिर्मितीच्या प्रकाषगढ येथे प्रकल्पग्रस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न.
महाऔष्णीक विद्युत केंद्रातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध समस्यांच्या संदर्भात मुंबई येथे
दि. 06 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध समस्यांच्या संदर्भात बैठकीत चर्चा केली.
महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेत सामावून घ्यावे व इतर मागण्यांच्या संदर्भात मुंबई येथील बांद्रा स्थित प्रकाशगढ येथे महानिर्मितीच्या कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या समस्येसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकÚयांनी शेतजमिनी देऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला असून अनेक शेतकरी भुमीहीन झाले असून त्यांच्या पाल्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. त्यासोबतच या उमेदवारांना विमा कवच व इतर सोयी उपलब्ध करुन देण्याची मागणी बैठकी दरम्यान केली. कोराडी येथे 17 जानेवारी पासून सुरु असलेल्या आमरण उपोषण सोडविण्याच्या संदर्भांने राज्य सरकार कुठलेही पाऊल उचलत नाही याची देखील खंत असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी महानिर्मितीचे संचालक धंनजय सावळकर यांनी महावितरण तर्फे येत्या आठ दिवसांत 800 जागा काढून 400 प्रकल्पग्रस्तांना नौकरी देण्याचे आश्वासन दिले. परंतू आमदार धानोरकर यांनी एवढ्या जागा काढून प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नसल्याचे सांगितले. सरकार ने विज कंपनी अंतर्गत असलेल्या तीन कंपन्यांच्या माध्यमातून किमान 2500 पदांची जाहिरात काढावी जेणेकरुन 50 टक्के प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकिय सेवेत स्थान मिळेल. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनतर समोरील बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार धानोरकर यांनी केली.
या बैठकीवेळी नाशिकच्या राष्ट्रवादीचे आमदार सौ. सरोज अहिरे, महानिर्मितीचे संचालक धंनजय सावळकर, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापक आनंद सर त्यासोबतच महाराष्ट्रातील विविध वीज प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment