*खांबाडा येथील घटना*
वरोडा : श्याम ठेंगडी
तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्परमध्ये मागून भरधाव वेगात असलेली दुचाकी घुसली. या घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ १२ फरवरी रोज सोमवारला रात्रौ 8 वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात मारोती चप्पलवार {२२), वैभव अडबले (२० ) दोघेही राहणार गोठाडी शेगाव, जि. वर्धा या दोघांचा मृत्यू झाला
प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथील गिता कन्ट्रक्शन कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ३४ – २८०६ हा डिझेल भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेल्या खांबाडा येथील पेट्रोल पंप वर आला. डिझल भरून परत जात असताना मागून तीन जण बसलेली दुचाकी भरधावं वेगात टिप्परच्या मागच्या बाजूने घुसली.या भीषण अपघातात मारोती चप्पलवार व वैभव अडबले या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
तिघेही वर्धा जिल्हातील गोठाडी शेगाव येथील रहिवाशी असून हे दोघेही मद्यधुंद असल्याची चर्चा आहे.सुरज नामक युवक जखमी आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी युवकांना वरोड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वरोडा पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment