स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाठीला चांगला भाव मिळणार.शेतीगटाला कापसाच्या गाठी स्वतः विकता येणार.

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाठीला चांगला भाव मिळणार.

शेतीगटाला कापसाच्या गाठी स्वतः विकता येणार.

वरोरा
शाम ठेंगडी वरोरा

स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी तर्फे कापूस गाठ तयार करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे . वरोरा तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून दोन ठिकाणी ही योजना राबवली जात आहे.

कापूस प्रक्रिया करताना प्रकल्पा अंतर्गत दिलेल्या जिनिंग मध्ये शेतकऱ्यांनी कापूस न्यायचा आहे.  एकाच स्टेपल लेंथचा कापूस उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला मिळेल. सध्या हमीभाव ६६२० रू  सुरु आहे. कापसाची गाठ तयार झाल्यानंतर याचा भाव लगबग 7300 पर्यंत जाईल. किंवा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या किमतीत तो जाणार आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल.यासाठी मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट कॉटन अंतर्गत ग्रेडर तर्फे मदत घेतली जाणार आहे. सध्या वरोरा येथील कृषी विभागाचे पंकज ठेंगणे कार्यरत आहे.
देशाचा रुई उतारा १०० किलो कापसातून ४३ किलो तर महाराष्ट्राचा अवघा ३३ किलो आहे. 

 रुई २४० रुपये प्रति किलो तर सरकी ३० रुपये प्रति किलो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा विरोधाभास लक्षात घेता रुई उतारा अधिक मिळेल यासाठी प्रयत्न करावे .

रुईच्या आधारे दर मिळाला तर शेतकऱ्याला नक्की फायदा होतो.

 त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे अर्थकारण समजावून घेत त्यानुसार मूल्यवर्धनावर भर दिला पाहिजे. 

सध्या वरोरा तालुक्यात तीनशे गाठी बनवण्यात आल्या असून आत्म्या अंतर्गत येणाऱ्या शेतकरी गटाने ह्या गाठी बनवून ठेवल्या आहेत. सध्या या गाठी वखार महामंडळात आम्ही ठेवण्यात आलेल्या आहेत. या गाठीचा भाव नक्कीच चांगला मिळणार असून यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्या मधातील दलाल आणि कमिशन संपुष्टात आले आहे.
या योजनेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल अशी अपेक्षा कांचनी शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे, सीईओ बालाजी धोबे, हिरालाल बघेले यांनी व्यक्त केली आहे.

       
*कापसाच्या गाठी तयार करून विकणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे : यशवंत सायरे*

वरोडा तालुक्यातील कापूस हे महत्त्वाचे पीक असून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतात. परंतु शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या कापूस विकण्याऐवजी आपला गट तयार करून विकल्यास त्यांना जास्त आर्थिक लाभ होत असल्याचे येथील चिनोरा एमआयडिसी मधील कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीत गटामार्फत कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 

*शेतकऱ्यांचा गट फायदेशीर*
       कापसाला मिळणारा भाव पाहता कापसाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.परंतू
 कापसाचे उत्पादन  घेण्याशिवाय पर्याय नाही. कापसाच्या भावात होणारा चढ-उतार पाहता शेतकरी कापसाला चांगला भाव मिळण्याची प्रतीक्षा करत असतो. तोपर्यंत तो कापूस घरातच साठवून ठेवतो. घरात कापूस साठवून ठेवल्याने त्यात त्याची प्रतवारी कमी होत असते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता आहे. यापेक्षा या कापसाच्या गाठी तयार करून त्या गोदामात ठेवण्यावर शेतकऱ्यांचा कल असून कापसाचे भाव वाढताच त्या विकल्याने शेतकऱ्यांना अधिक लाभ होत असल्याचे मत कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत या सर्व व्यवहारावर शासकीय नियंत्रण आहे. कापसाला दर मिळत नसल्याने यावर्षी प्रथमच अनेक शेतकऱ्यांनी  कापसाच्या गाठी तयार करणे सुरू केले आहे. यासाठी शेतकर्‍यांनी प्रथमच पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. या कंपनीत शेतकऱ्यांच्या तीन गटातून कापसाचे संकलन करण्यात आले आहे. एका गटात 13 शेतकऱ्यांचा समावेश आहे.कापसाच्या गाठीला दर चांगला मिळणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

येत्या काही दिवसात
उन्हाळा सुरू होणार असल्याने घरात अधिक दिवस कापूस ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होते. घरातील व्यक्तिना कापसापासून आजार होणे, आगी लागणे आदी शक्यता असते.

 *दर मिळताच गाठी विकणार* 
कापसाच्या गाठी तयार करून त्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात येत आहेत. ज्या दिवशी कापूस गाठीला अधिक दर मिळेल, त्यादिवशी शेतकरी त्या गाठी विकणार आहेत.

कापूसगाठी काही दिवस ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होत नाही. कापसाच्या गाठी तयार करून शेतकरी विकत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

       

  



Comments