महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती*

*महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती*

वरोरा 26/2/24
सुनील शिरसाट

वरोरा (प्रती) वरोरा येथील सराफा व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. मा.आ. प्रतिभाताई धानोरकर, वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांच्या आदेशाने मा. कुणालजी राऊत, प्रदेशाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस यांच्या वतीने नियुक्तीपत्र देऊन चेतन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी अमर गोंडणे,प्रदेश सचिव ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनु. जा. विभाग) गौतमभाऊ अंबाडे  , विधानसभा प्रमुख , (उत्तर नागपूर अनुसूचित जाती विभाग )निलेश खोब्रागडे, विभाग प्रमुख , (उत्तर नागपूर युवक काँग्रेस ) तसेच अभिजीत गमे ,अभय ठावरी,रुपेश दुग्गड वरोरा हे उपस्थित होते 
२००७ ते २०१२या कालावधीत चेतन शर्मा हे युवक काँग्रेस अध्यक्ष वरोरा शहर या पदावर कार्यरत होते तर २०१२ ते २०१४ मध्ये जिल्हा महासचिव युवक काँग्रेस म्हणून त्यांनी काम पाहिले चेतन शर्मा हे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. दांडगा जनसंपर्क तसेच पक्ष संघटन व पक्षाचे मजबुतीकरण करणे असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला चेतन शर्मा यांच्या निवडीबाबत मा. विलास टिपले ,माजी नगराध्यक्ष वरोरा ,मा.मिलिंद भोयर ,तालुका काँग्रेस अध्यक्ष वरोरा, मा.राजेंद्रजी चिकटे , माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मा. राजू महाजन, माजी नगरसेवक मा. सलीम पटेल, अल्पसंख्यांक सेल वरोरा यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Comments