बोर्डा चौकात जुगार अड्ड्यावर धाडऑनलाइन Nice7777.fun क्रिकेट सट्टावर कारवाई करण्याची आवश्यकता

बोर्डा चौकात जुगार अड्ड्यावर  धाड

ऑनलाइन Nice7777.fun क्रिकेट सट्टावर कारवाई करण्याची आवश्यकता

चेतन लुतडे
वरोरा

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बोर्डा चौक येथे एका दुकानांमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती हाती आली आहे. यामध्ये वरोरा शहरातील युवकांना पोलिसांनी पत्त्यावर पैसे खेळत असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळायची आहे.
अधिकचा तपास पोलीस करत असून लवकरच जुगार खेळणाऱ्यांची नावे व मुद्देमाल याची माहिती उघड होणार आहे.
नवीन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी रुजू झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
याच पद्धतीने ऑनलाईन क्रिकेट वर सट्टा खेळणाऱ्या NICE7777.fun  जुगारावर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. हा नवीन पद्धतीचा जुगार क्रिकेटवर सामन्यावर मोठ्या प्रमाणात वरोरा शहरात सुरू आहे. 
आनंदवन चौक, सरदार पटेल वार्ड, गांधी चौक, देशपांडे ग्राउंड, मिलन चौक,  पाण्याची टाकी, वनी येथून नवीन आलेले सट्याचे व्यापारी, या चौकातील मागील बऱ्याच वर्षापासून कार्यरत असलेले  एजंट मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय छुप्या मार्गाने चालवीत आहे. 
 
याच पद्धतीने या लोकांवर सुद्धा आळा घालण्याची गरज पोलिसांना आहे.

Comments