वरोडा :-शाम ठेंगडी
वरोडा पोलिसांनी तालुक्यातील टेमुर्डा गावामागील झुडपात पैसे घेऊन सट्टापट्टीच्या आकड्यावर खेळणाऱ्या 15 व्यक्तींवर कारवाई करत चार लाख 48 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.
वरोडा पोलिसांना 1मार्च रोज शुक्रवारला टेमुर्डा गावामागील झुडपी परीसरात काही जण सट्टापट्टीच्या आकडयावर पैसे घेवून हारजीतचा जुगार खेळत आहे अशी गुप्त माहिती प्राप्त झाली.
या माहीतीचे आधारे येथील पोलीसांनी सापळा रचून घमटनास्थळावर छापा टाकला व पोलिसांनी घटनास्थळावरून ११ मोटारसाईकल, आरोपींचे मोबाईल, नगदी रोख २५,०००/रू असा एकूण ४,४८,३३५/- रू चा मुद्देमाल जप्त करून १५ आरोपींवर कार्यवाही केली.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, नापोअं मोहन निशाद, पोअं. शशांक बदामवार, फुलचंद लोधी यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment