गोवंश तस्करी करणारा ट्रक भद्रावती पोलिसांनी पकडला**एक आरोपी अटकेत : 38 गोवंशाची मुक्तता*

*गोवंश तस्करी करणारा ट्रक भद्रावती पोलिसांनी पकडला*

*एक आरोपी अटकेत : 38 गोवंशाची मुक्तता*
अतुल कोल्हे भद्रावती.
                 गोवंशांना कत्तलीसाठी तेलंगाना राज्यात घेऊन जात असलेल्या एका ट्रकला भद्रावती पोलिसांनी पकडून ट्रक मध्ये कोंबून असलेल्या 38 गोवंशाची मुक्तता करण्यात आली आहे. सदर घटना दिनांक 22 रोज शुक्रवारला सकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी ट्रकचा चालक गुलाम कुरेशी, वय 50 वर्ष, राहणार छत्तीसगड याला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. या सर्व गोवंशाची रवानगी गवराळा येथील गोशाळेत करण्यात आली आहे.गोवंशाची  तस्करी करणारा एम.एच. या 40 बी एल 93 86 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर येथून तेलंगाना राज्यात जाण्यासाठी निघाला. दरम्यान चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर ट्रकचा पाठलाग केला असता ट्रक चालकाने ट्रक भद्रावतीकडे पळविला.
 शहरात आल्यानंतर या ट्रक चालकांने भर वेगात हा ट्रक शहरातील पंचशील नगर परिसरातील एका घरात घातला. मात्र सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. याची माहिती भद्रावती पोलिसांना व भाजप पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले व  ट्रक चालकाला अटक केली. तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये करकचून बांधण्यात आलेले व कोंबून ठेवलेले 38 गोवंश आढळून आले. पोलिसांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी या सर्व गोवंशाची मुक्तता करून त्यांची रवानगी गवराळा  येथील गोशाळेत केली. गोवंशाच्या  सुटकेसाठी प्रशांत डाखरे, इमरान खान,अफजलभाई, सत्तार भाई, लिमेश माणूसमारे, सुनील नामोजवार, प्रवीण सातपुते आदींनी प्रयत्न केले. सदर घटनेचा तपास ठाणेदार बीपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments