आयपीएल सुरू होताच गाव खेड्यात एजंट झाले सक्रिय.
वरोरा
चेतन लुतडे
मागील बऱ्याच वर्षापासून क्रिकेट टीमवर जुगार खेळल्या जात आहे. यावर्षी वुमन्स क्रिकेट लिग. म्हणजे डब्ल्यू पी एल यामध्ये बुकिंने अनेक शालेय विद्यार्थीना या जुगारात बरबाद केले असून याचा त्रास पालकांना सहन करावा लागत आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वरोरा तालुक्यात कित्येक वर्षापासून ठराविक लोक या जुगाराचा उपयोग करून अवैध व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक पान ठेवल्यावर, खेडेगावात, मोबाईलवर क्रिकेटचा सट्टा खेळल्या जात आहे. मोबाईल मध्ये असणाऱ्या वेबसाईटवर ज्याचे नाव. Www.Purple9.com आहे.
यामध्ये विद्यार्थी किंवा युवकांना पैसे भरल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळतो. यानंतर मोबाईलच्या या आपलिकेशन वर युवक दिवस रात्र क्रिकेटवर व तीन पत्ती, अशी अनेक प्रकारचे जुगार या माध्यमातून खेळताना दिसत आहे.
मात्र या वेबसाईट वर अजून पर्यंत संबंधित प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे अशा बुकिंनी चांगलीच माया जमवली आहे. यांचे पायमुळे वनी व यवतमाळ येथील बुकीपर्यंत पसरलेले असून मागील आयपीएल दरम्यान यवतमाळ येथे पोलिसांनी रेड पाडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र यानंतर कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. वरोरा येथील अधिकारी कडक असल्याने जिल्हा बाहेर जाऊन आपला व्यवसाय सांभाळत आहेत.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनी बायपास चौक, आनंदवन चौक , बोर्डा चौक, जुनी पाण्याची टाकी, टेमुडा खांबाडा, नंदोरी,शेगाव, माढेळी अशा अनेक ठिकाणी या अवैध व्यवसायाचे एजंट नेमले असून या माध्यमातून लाखो रुपयांचा अवैध व्यवसाय वरोरा शहरात केल्या जात आहे.
पहिले विद्यार्थ्यांना सवय लावण्यासाठी पैसे जमा न करता खेळवले जाते . त्यानंतर या युवकांकडे पैशाचा तगादा लावल्या जातो. त्यामुळे तरुण विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओडल्या जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वरोऱ्यातील ठराविक जुगार चालवणाऱ्या बुकिंना धडा शिकवणे आवश्यक आहे.
आयपीएल 2024 दिनांक 22 तारखेला सुरू होत आहे. यासाठी शहरात एजंट सक्रिय झाले असून आपल्या फंटर कडून पैसे जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड दिले जात आहे. अशा प्रकारच्या अनेक वेबसाईट सट्टा किंग तयार करीत असून या वेबसाईटवर प्रत्येक बुकीचे नियंत्रण असते. ते आपल्या पद्धतीने अशा युवकांना जुगारामध्ये अटकवून हरवू शकतात. अशी सिस्टम या आपलिकेशन मध्ये तयार केली गेली आहे.
त्यामुळे युवकांना अशा वेबसाईटवर प्रलोभन देऊन सवय लावली जाते यानंतर या जुगारात हरण्या शिवाय दुसरा पर्याय नसतोच. त्यामुळे तरुण युवकांनी अशा वेबसाईटकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे.
वरोर शहरात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी अशा जुगारात ओढल्या जात असल्याने या जुगारावर एक तरी मोठी कारवाई होईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment