चंदनखेडा येथे तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धां संपन्न**नेहरू युवा केंद्र, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य व उत्फृर्त क्रिडा मंडळ यांचे आयोजन*

*चंदनखेडा येथे तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धां संपन्न*

*नेहरू युवा केंद्र, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य व उत्फृर्त क्रिडा मंडळ यांचे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             तालुक्यातील सातवाहनकालीन नगरीतील नरवीर तानाजी क्रिडोधान चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य व उत्फृर्त क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने तिन दिवसीय तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. 
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील नरवीर तानाजी क्रिडोधान मैदानात ८ मार्च २०२४ ते १० मार्च २०२४ तिन दिवसीय कार्यक्रमाचे ८ मार्च २०२४ ला सायंकाळी मान्यवर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते  तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन करण्यात आले .विविध क्रिडा स्पर्धा पार पडल्या जसे की कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक बिरसा मुंडा क्रिडा मंडळ कोकेवाडा (मा) यांनी पटकावला तर दुत्तिय  राॅयल चॅलेंजर क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी पटकावला तर व्हाॅलिबाॅल स्पर्धत खाटिक वार्ड क्रिडा मंडळ यांनी पटकावला तर दुत्तिय बालेघाटी क्रिडा मंडळ यांनी पटकावला तर दौंड स्पर्धत प्रथम क्रमांक अमर विनायक श्रिरामे यांनी पटकावला तर दुत्तिय श्रिकांत बावणे यांनी पटकावला.  जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च ला महिलांची मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात कृतिका दडमल  यांनी प्रथम क्रमांक पटकावला,तर दुत्तिय क्रमांक  पृर्वी कोकुडे नि पटकाविला ,तर तृतीय क्रमांक अमृता हशवते नि पटकाविला.१० मार्च ला स्लो- सायकलिंग स्पर्धेत अरमान शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला, दुत्तिय अरशद शेख याने पटकाविला.रस्सीखेच स्पर्धेत प्रथम क्रमांक युवा बालगोपाल क्रिडा मंडळ यांनी पटकावला.तर खो-खो स्पर्धेत जिजाऊ क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.महिला कबड्डी स्पर्धेत जिजाऊ क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. संपूर्ण विजेता संघास नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांचे कडुन सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र व शौर्य व उत्फृर्त क्रिडा मंडळाकडून रोख पारितोषिक देऊन उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते, मंगेश नन्नावरे, शुभम भोस्कर, गणेश हनवते,शरद श्रीरामे, आशिष हनवते  यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी संपूर्ण क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी , मंगेश हनवते, लोकेश कोकुडे,दिलिप ठावरी, राहुल कोसुरकार, शंकर दडमल, प्रज्वल बोढे, दिनेश दोडके, आदित्य दोडके, देवानंद दोडके, राहुल दडमल,भुपेश निमजे, कुणाल ढोक, प्रविण भरडे,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे व शौर्य व उत्फृर्त विरांगना मुक्ताई व बिरसा मुंडा क्रिडा मंडळ कोकेवाडा (मा) उपस्थित संपूर्ण क्रिडा  मंडळाच्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सदस्यानी व गावकरी मंडळीनी मोलाचे सहकार्य केले.

Comments