वरोडा : श्याम ठेंगडी
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेचा शुभारंभ 3 मार्च रोज रविवारला येथील उपजिल्हा रुग्णालय येथील प्रथम बूथ वर करण्यात आला. शहरातील सर्व केंद्रावर आज 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.प्रफुल खुजे यांच्या हस्ते रसिका सुनील गायकवाड नामक नऊ महिन्याच्या मुलीला पल्स पोलिओ डोज पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
वरोडा शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी एकूण 32 बूथचे नियोजन करण्यात आले आहे . 0 ते 5 वर्ष वर्षाखालील 3143 लाभार्थींना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत 3 मार्चला सुटलेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. ही मोहीम 5 मार्च ते 9 मार्च पर्यंत चालू राहणार आहे.घर भेटी देण्याकरिता 15 टीमचे नियोजन करण्यात आले आहे.जेणेकरून शहरातील एकही लाभार्थी पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विरुटकर ,परिसेविका सरस्वती कापटे, इंदिरा कोळपे, अधिपरिचारिका रुबीना खान व प्रियंका दांडेकर , आरोग्य सहाय्यक सतीश येडे, आरोग्य मित्र अमोल भोंग,आरोग्यसेवक देव जुलमे हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment