*नागपूर येथे होणार आढावा बैठक*
अतुल कोल्हे भद्रावती :-
दिनांक 7 आँगस्त 2024 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर ,पंजाब राज्यात येथे आयोजीत करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूर येथे रविवार दिनांक 5 मे 2024 बैठकीचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर रम न.10 मध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे, या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजीत करण्यात आले आहे.
उपरोक्त बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,महिला महासंघ, युवा - युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ , वकील महासंघ तसेच सर्व राष्ट्रीय पदाधिकारी , महाराष्ट्र कार्यकारिणी , विदर्भ कार्यकारिणी , सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी बैठकेला उपस्थित राहावे.असे अवाहन राष्ट्रीय ओबीसी महांघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment