सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रावर काम करणार : किशोर टोंगे *किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रावर काम करणार : किशोर टोंगे 

*किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

वरोरा
चेतन लुतडे 
लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या जनप्रतिनिधींना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वरोरा भद्रावती क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी भाजपात नुकताच प्रवेश घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या विचारावर भारतीय जनता पक्ष काम करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत किशोर भाऊ टोंगे यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नक्कीच वरोरा भद्रावती क्षेत्रातील भाजपाचे हात बळकट झाले आहेत. जातीय समीकरण आणि उच्च शिक्षित आणि राजकारणाचे गाढे अभ्यासक  किशोर भाऊ टोंगे हे विधानसभेचे उमेदवार ठरू शकतात. अशीही चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रवेशाने दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने पक्षाचे काम पुढे नेणार असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले. भाजपातील  मित्रांनी भाजपात प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.
किशोर भाऊ टोंगे यांच्यासह त्यांचे खंदे समर्थक  शंकर रासेकर सरपंच सागरा, बालाजी जिवतोडे सरपंच शेम्बळ, कामगार नेते अजय, सामाजिक कार्यकर्ते अतुल हेकाड, गजानन भोयर, युवराज निबूदे, शुभम आमने यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.

पंतप्रधान मोदीजी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्र हा मोठी भूमिका बजावत असून प्रेरित होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होत असलेल्या विकासात विशेषता विदर्भाला विकासाची मोठी संधी आहे.

सर्वत्र होत असलेल्या विकास कार्याला आपल्या मतदार संघात पर्यायाने जनतेपर्यंत विकासाची गंगोत्री पुढे नेण्यासाठी जिल्ह्याचे यशस्वी नेतृत्व विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे किशोर टोंगे म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचा विचार मतदार संघातील शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेमध्ये विजय प्राप्त होईल यासाठी सर्व सहकारी कटीबद्ध राहू असं मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रवेशादरम्यान  भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवरावजी भोंगळे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश देवकाते, ब्रिजभूषण पाझारे वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, प्रवीण ठेंगणे व अन्य नेते गण उपस्थित होते.



Comments