स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांची भद्रावती बस स्थानकाला भेट**बसस्थानक परिसराची केली पाहणी*

*स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांची भद्रावती बस स्थानकाला भेट*

*बसस्थानक परिसराची केली पाहणी*

अतुल कोल्हे भद्रावती :-
        हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक या अभियानांतर्गत राज्यातील सर्व बस स्थानके स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार भद्रावती येथील बस स्थानकाला दिनांक 26 रोज शुक्रवारला राज्य परिवहन मंडळाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन बस स्थानक स्वच्छते संबंधी पाहणी केली. यावेळी तपासणी अधिकारी पराग शंभरकर, राकेश तलमले, तनुजा अहिरकर, भद्रावती बस स्थानक वाहतूक नियंत्रक एबट मॅडम, कडाम सर, परचाके सर, पत्रकार अतुल कोल्हे, सफाई कामगार मंगल पोईनकर व प्रवासी मित्र उपस्थित होते. यावेळी तपासणी पथकाने बस स्थानक परिसराची पाहणी करून बस स्थानक कर्मचाऱ्यांना स्वच्छते संबंधित सूचना दिल्या व बस स्थानक परिसर हा नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. बस स्थानक परिसरातील स्वच्छतेमुळे बस प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
==================================
पाहत रहा लाईव्ह चंद्रपूर Gtpl72.......

Comments