अतुल कोल्हे भद्रावती :-
चंद्रपूर येथील बालाजी मंदिर सभागृहात पार पडलेल्या विदर्भस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भद्रावती येथील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंनी नेत्र दीपक खेळ सादर करीत सात सुवर्णपदके, दोन रजत पदके तर एक कांस्यपदक प्राप्त केले. सदर स्पर्धेत विदर्भातील जवळपास दोनशे खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत फाईट आणि काताचे उत्तम प्रदर्शन करीत कुमारी दामिनी सूर्यवंशी हिने 40 ते 45 वजनगटात सुवर्णपदक, अपूर्वा व्यवहारे हिने 30 ते 35 वजन गटात सुवर्णपदक, साची चावरे हिने 25 ते 30 वजन गटात सुवर्णपदक, कशीश रोगे हिने ओपन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक, साक्षी कपाट हिने 25 ते 30 वजन गटात सुवर्ण पदक, ओम बनपूरकर याने 25 ते 30 वजन गटात सुवर्णपदक व व्रिजल कांबळे हिने दहा ते पंधरा वजन गटात सुवर्णपदक पदक प्राप्त केले. ऋतुजा घोडे हिने 40 ते 45 वजन गटात रजत पदक व शोधार्थ रॉय यांनी 30 ते 35 वजन गटात रजत पदक प्राप्त केले. तर वृत्ती कांबळे हिने 15 ते 20 वजन गटात कांस्यपदक प्राप्त केले. सर्व यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मास्टर राकेश दीप, मास्टर शितल तेलंग, मास्टर संदीप चावरे आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे. यशस्वी खेळाडूंचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment