*भद्रावती वरोरा तालुक्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले**श्रीराम नगर येथील वट वृक्ष कोसळला तर चोरा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू*

*भद्रावती वरोरा तालुक्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले*

*श्रीराम नगर येथील वट वृक्ष कोसळला तर चोरा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              भद्रावती तालुक्याला पुन्हा एकदा दिनांक 9 रोज गुरुवारला दुपारी एक वाजता अवकाळी वादळी पावसाने झोडपले. या वादळी पावसात वीज कोसळून शहरातील श्रीरामनगर येथील माजी नगर सेवक चंद्रकांत खारकर यांच्या घरासमोरील 18 वर्षे जुने वडाचे झाड मंदिर तथा घरांच्या वाल कंपाऊंडवर कोसळल्याने मंदिराचे व दोन घरांच्या वॉल कंपाऊंडचे मोठे नुकसान झाले.
 तर तालुक्यातील चोरा गाव शिवारात वीज पडून अरुण दशरथ चिकटे व सुनील नामदेव आसुटकर यांच्या प्रत्येकी एका बैलांचा मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजता पासून तालुक्यात विजेच्या कडकडेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. या वादळी पावसाने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले असून तालुक्यातील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वीही तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले होते. या वादळात  तालुक्यातील माजरी गावातील घरांची मोठी पडझड झाली होती. 
वरोरा तालुक्यात सोसाट वाऱ्यासह वादळी पावसाने जबर हजेरी लावली यामध्ये वरोरा शहराची लाईन व्यवस्था कोलमडली होती. बऱ्याच ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. भर उन्हाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी शेतातील कामे रखडली असून  शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

Comments