*बेलोरा कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या**मानवाधिकार पार्टीचे अरबिंदो कंपनीला निवेदन*

*बेलोरा कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या*

*मानवाधिकार पार्टीचे अरबिंदो कंपनीला निवेदन*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
                अरबिंदो  रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून तालुक्यातील बेलोरा- जेना परिसरात कोळसाखान सुरू करण्यात आली आहे. या कंपनीत 70% स्थानिकांना रोजगार देण्यात यावा यासाठी मानवाधिकार पार्टीचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर बिश्वास मुखर्जी यांनी एका शिष्टमंडळासह अरबिंदो  कंपनी व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष चर्चा केली व कंपनीत स्थानिक बेरोजगारांनाच  रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर जसजसा खाणीचा विस्तार होत जाईल तसतसा कंपनीत स्थानिक बेरोजगारांनाच रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सदर कंपनीतर्फे देण्यात आले. यावेळी मानवाधिकार पार्टीच्या वतीने डॉक्टर विश्वास मुखर्जी यांच्या नेतृत्वात कंपनीला याविषयी एक निवेदन सादर करण्यात आले.अरबिंदो  कंपनीतर्फे तालुक्यातील बेलोरा, टाकळी, जेना, पानवडाळा आदी  परिसरात कोळसाखान सुरू करण्यात आली असून खाणीच्या विस्तारासाठी कंपनीतर्फे या परिसरातील शेतजमीन अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याने या परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराविषयक अशा पल्लवीत झाल्या आहे. सदर चर्चेला पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन राय, विदर्भ अध्यक्ष डॉक्टर बिस्वास मुखर्जी जय आंडी, श्री फाले आदी उपस्थित होते.

Comments