मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्दैवी अंत.* *अवैध वाळू उत्खनन करणारे खड्डे ठरले जीव घेणे.*
*अवैध वाळू उत्खनन करणारे खड्डे ठरले जीव घेणे.*
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा येथील रहिवाशी असलेल्या मानस राऊत याचा वर्धा नदीपात्रात बुडून दुःखद निधन झाल्याची दुःखदाय घटना आज दुपारी घडली आहे.
यात्रा वार्ड यथील मानस व त्याचे दोन मित्र सकाळी हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी मार्डा डॅम जवळील भागात पोहण्याचा बेत आखला तिनही मित्र सायकलने मार्डा डॅम जवळील ,दांडगाव रोड नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. मानस व त्याचे मित्र वयाने लहान असून पोहणे सुद्धा बरोबर येत नव्हते. तीनही मित्रांनी पाण्यामध्ये उतरून पोहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने मानस खोल पाण्यामध्ये गेला. या ठिकाणी वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळूचे मोठेखड्डे तयार केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या खड्याचा अंदाज न आल्याने मानस अविनाश राऊत वय 13 वर्ष , पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घाबरलेल्या अवस्थेत दोन्हीही मित्रांनी सायकल पकडून घरचा रस्ता पकडला.
मित्रांनी हा सगळा प्रकार घरी येऊन सांगितला . त्यानंतर शोधा शोध सुरू झाली. मित्रपरिवार व आई वडील मानसच्या शोधात वर्धा नदीपात्रात येऊन पोहोचले. यानंतर वरोरा पोलीस व मारेगाव पोलीस यांना पाचारण करण्यात आले. यानंतर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मानसच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे .
******************************************
भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचालिका व नदोरी ग्रामपचायत सरपच तथा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे सघंटक मगेश भोयर यादी गावकरी मडळी उपस्थित कार्यक्रम पार पडला.
**************************************
Comments
Post a Comment