अतुल कोल्हे भद्रावती.
दहावी सीबीएससी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या अयान अजाणीसह तालुक्यातील अव्वल आलेल्या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील फेअरीलैंड शाळेत दिनांक 20 रोज सोमवारला करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक तथा फेरीलँड शाळेचे संचालक एड. युवराज धानोरकर यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक एड. युवराज धानोरकरष प्राचार्य वर्षा धानोरकर, विधानसभा संघटक नरेश काळे, माजी नगरसेवक राजु सारंगधर, महिला शहर प्रमुख तृप्ती हिरादेवे, सामाजिक कार्यकर्ते विनोद कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अयान अजाणी नारायणा विद्यालय 98.80% शर्वरी नंदनवार फेरीलैंड स्कुल ९६.६० टक्के, मानसी राऊत केंद्रीय विद्यालय 94.20%, प्रज्ञा दियेवार फेरीलैंड स्कुल 93.20%, वृषाली नैताम फेरीलैंड स्कुल 91.80% व शिफाली पिट्टलवार फेरीलैंड स्कुल 89.60% या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एड.युवराज धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य वर्षा धानोरकर यांनी तर आभार प्रमोद निमजे यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थीष शिक्षक तथा पालक वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment