निमढेला गेट येथील हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी.निमढेला पर्यटन गेट अनिश्चित कालावधीसाठी बंद.

निमढेला गेट येथील  हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी.

निमढेला पर्यटन गेट अनिश्चित कालावधीसाठी बंद.

वरोरा 18/5/24
चेतन लुतडे 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निमढेला गेट येथील हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी करण्यात आली आहे. 
मागील काही दिवसापूर्वी खानगाव परिसरातील एका शेतकऱ्याची शिकार केली होती. यानंतर गावातील लोकांनी उद्रेक करत जंगलाला कंपाऊंड करा अन्यथा निमढेला गेट बंद करा .अशी भूमिका घेतल्याने. वन विभागाने अनिश्चित कालासाठी नेमढेला गेट बंद करण्यात आले आहे. खानगाव येथील लोकांच्या या भूमिकेमुळे निमढेला गेटमधून जाणारे पर्यटक आता नवेगाव गेटमधून सोडण्यात येत आहे. जवळपास रोज वीस गाड्या या गेटमधून पर्यटनासाठी सोडल्या जात होत्या. याचबरोबर रामदेगी परिसरात या जिप्सीचा थांबा सुद्धा बंद करण्यात आला आहे. यामुळे तेथील दुकानदारावर उपासमारीची वेळ आली आहे. 

 वन विभागाने अथक प्रयत्न करीत मॅन इटर हजारे वाघाला रामदेगी परिसरात बेशुद्धीचे औषध मारून वनविभागाच्या टीमने शनिवारी सकाळी  जेरीबंद केले. यानंतर लगेच या वाघाची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा झू येथे करण्यात आलेली आहे. याचबरोबर अजून हजारे याचा भाऊ शिवा नावाच्या वाघाला या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याची खात्री लायक बातमी वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. यासोबतच आठ वाघ स्थानांतरण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ताडोबातील वाघांचे माहेरघर असलेल्या निमढेला पर्यटन घेतला चांगलाच फटका बसला असून 
रामदेगी परिसरातील हमखास दिसणारे वाघ आता मात्र पर्यटकांसाठी लुप्त झालेले  दिसणार आहे. यानंतर या छोटा मटका फॅमिलीतील वाघांची संख्या कमी झाली असून या ठिकाणा वरून बाकीचे वाघ इतरत्र स्थलांतरित झालेले दिसत आहे. त्यामुळे रामदेगीच्या मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना ही आता वाघ पाहता येणार नाही. अशी खंत पर्यटक व भाविक व्यक्त करीत आहे.

या सगळ्या कारणामुळे अल्पावधीत नावलौकिक झालेले निमढेला गेट ओस पडल्याचे  दिसत आहे.


Advertising

Comments