वरोरा विधानसभा क्षेत्रात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न**वाढदिवसाचे औचित्य : रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सत्कार उपक्रम*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न*

*वाढदिवसाचे औचित्य : रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सत्कार उपक्रम*

वरोरा/भद्रावती : 
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख, यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना सचिव वरून सरदेसाई, उपनेत्या शितल देवरुखकर सेठ, कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर युवासेना संपर्क प्रमुख सूर्या हिरेकण तसेच 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अधिकारी रोहन कुटेमाटे व युवतीसेना अधिकारी प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वा वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपन, प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
या अंतर्गत सकाळी ९:०० वाजता भद्रावती येथील ग्रामिण रूग्णालयात रूग्णाना फळवाटप करण्यात आले तसेच रुग्णालय परीसरात वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिष सिंग यांच्या हस्ते युवा-युवती सेना, महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर भद्रावती पोलीस स्टेशन येथे सुध्दा ठाणेदार विपीन इंगळे तथा पोलीस उपनिरीक्षक किशोर मुळे यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. पश्चात शिवनेरी भद्रावती कार्यालयात केक कापून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा करीता शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भद्रावती तालुका प्रमुख नंदुभाऊ पढाल, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हा अधिकारी रोहन कुटेमाटे, जिल्हा चिटणीस येशु आरगी, तसेच भद्रावती युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, तालुका समन्वयक गौरव नागपूरे, तालुका चिटणीस अनिरुध्द वरखेडे, उपतालुका युवाअधिकारी सतिश आत्राम, विभाग युवाधिकारी महेश येरगुडे विकास कंडे, शहर युवा अधिकारी मनोज पापडे, शहर चिटणीस समिर बल्की, शहर समन्वयक तेजस कुंभारे, उपशहर युवाधिकारी गौरव नवघरे, उपशहर युवाधिकारी गोपाल पारोधे, साहिल काकडे, प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते, तसेच युवतीसेने कडून जिल्हा समन्वयक अश्लेषा मंगेश भोयर, उपजिल्हा युवती अधिकारी शिव गुडमल, युवती विधानसभा संघटक कनिष्का आस्वले तसेच  ज्ञानेश्वर डुकरे, सुनिल मोरे, पंकज कातोरे, आदर्श आसुटकर, राकेश चोखारे, कुणाल कुटेमाटे, राहुल खोडे, तसेच सुष्माताई शिंदे, भावना खोब्रागडे, प्राजक्ता जुनघरे, शिला आगलावे, लता ठेंगणे, राधा पारपल्लीवार, रुपाली साखरकर तथा पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. वरोरा येथील उप-जिल्हा रूग्णालयमध्ये रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
मुख्य कार्यक्रम वरोरा येथील विधानसभा प्रमुखाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे घेण्यात आला. यावेळी प्रथम आई तुळजाभवानी मातेची पुजन व आरती करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यांनतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात करतांना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेचे पुजन करुन करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषण हिरालाल लोया कनिष्ठ विद्यालय वरोरा माजी प्राचार्य कावलकर गुरुजी, शहरप्रमुख खेमराज कुरेकार, युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा भोयर तसेच अध्यक्षीय भाषण स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी केले 10वी व 12वी मध्ये प्राविण्यप्राप्त 29 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आले व परीसरात वृक्षारोपन करण्यात आले. 
याप्रसंगी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापिठ तथा पुर्व विदर्भ समन्वयक युवासेना निलेश बेलखेडे, विधानसभा प्रमुख रविद्र श्रीनिवास शिंदे, चंद्रपूर जिल्हासंघटीका नर्मदाताई बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, वरोरा तालुका प्रमुख दताभाऊ बोरेकर, वैभव डहाणे, मंगेश भोयर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, सरला मालोकर, सुधाकर बुराण, प्रशांत कारेकार, सचिन चुटे, रवी रॉय, मंगेश भोयर, अश्लेषा जिवतोडे, प्रिती पोहाणे, प्रतिभा मांडवकर, गजानन कुरेकार, गजानन गोवारदिपे, कल्पनाताई टोंगे, आदी मान्यवर तसेच उपजिल्हा युवाधिकारी शरद पुरी, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, तालुका युवाधिकारी विक्की तवाडे, तालुका समन्वयक शुभम कोहपरे, तालुका चिटनिस फैजल शेख, शहर युवाधिकारी प्रज्वल जाणवे, शहर चिटणिस सृजन मांढरे यांच्यासह युवतीसेना पदाधिकारी तालुका युवती अधिकारी प्रणाली  मडकाम, तालुका चिटणीस साक्षी वैद्य, शहर युवती अधिकारी तेजस्विनी चंदनखेडे, उपशहर युवती अधिकारी साक्षी जगदिश रोकडे, उपशहर युवती अधिकारी साक्षी दौलतकर, शहर उपसमन्वयक नेहा पवन किन्नाके तसेच  मोठया संख्येने जेष्ठ, युवा, महिला कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना रविंद्र शिंदे म्हणाले की, वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षातर्फे सुरू असलेले सामाजिक कार्य असेच सुरू राहणार व शिवसेना पक्ष 80% समाजकारण व 20% राजकारण करणारा असुन यात कोणताही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नाही, समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना समान हक्क या नात्याने कार्य करणारा हा पक्ष आहे. तसेच चालवित असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातुन सुध्दा गरजु नागरीकांना मदत करण्याचे कार्य अविरत सुरु राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्नेहा गिरडे-ढुमणे, प्रास्ताविक सरला मालोकर व आभार प्रदर्शन प्रा. प्रिती पोहाणे यांनी केले.

Comments