तालुक्यातील बार आणि बियर शॉप झाले सैराट कायद्याचे बंधन नसल्याची टीका

तालुक्यातील बार आणि बियर शॉप झाले सैराट 

कायद्याचे बंधन नसल्याची टीका 

वरोरा 
सारथी ठाकूर

वरोरा तालुक्यातील दारू दुकानाच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मद्य विक्रीसाठी दुकानदाराची होड लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड दारू विक्री होत आहे. मात्र याच्यावर राज्य उत्पादन शुल्काचा कसलाही निर्बंध दिसून येत नाही. प्रत्येक खेड्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री करताना दिसत आहे. 

तालुक्यातील काही बार सकाळी आठ वाजेपासून सुरू होतात. आणि रात्री बारा वाजेपर्यंत मागच्या दरवाज्याने उघडेच असतात ‌. बंद  तारखेला  दुकानापुढेच दारू विकली जाते. वरोरा तालुक्यात वाईन शॉप एकच असल्यामुळे संपूर्ण खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू, अवैधरीत्या पोचवली जाते. दरवेळेस राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे या संबंधात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचा तपशील दिल्या जातो. 
त्यामुळे आता कोणाचेच लक्ष मद्य विक्रेत्यांकडे राहिले नाही अशी टीका जनतेकडून होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अधीक्षकांसह अधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने या कार्यालयात काय होत असेल यावरून कल्पना करता येईल. 

तरीसुद्धा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला जागा आलेली नाही.

वरोरा तालुक्यात एकाच दुकानात बार आणि बियरचे लायसन सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिकचा दर द्यावा लागतो. सिग्नेचर MRP 365 रू मध्ये मिळणारी निप ,विदेशी दारू चक्क 550रू भावाला विकली जात आहे . बियर 180 रुपयाची  300 रू ला विकली जाते. परमिट रूमच्या बाहेर पर्यंत आलिशान टेबल लावून अवैदरीच्या दारू विकली जाते. सर्विस चार्जच्या नावाखाली 60% पर्यंतची आधीकची रक्कम ग्राहकाकडून वसूल करण्यात येत आहे. 
आणि दुकानदाराला जीएसटी बिल मागितले तर ग्राहकांसोबत हूज्जत बाजी केली जाते. तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेला तरी आमचे काही बिघडवू शकत नाही असे उद्धट उत्तर देण्यात येते. 
दुकानदार वॅट किंवा जीएसटी  बिल मागितल्यास देत नाही . काहींजवळ बिलबुकच नाही.  मागील वर्षी या संबंधात बऱ्याच बातम्या येऊन गेल्या मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला अजून पर्यंत जाग आलेली नाही. नाममात्र कारवाई दाखवून कारवाई केल्याचा आव आणला जात आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते मात्र मद्य प्राशन करणारे  परवान फार कमी जणा जवळ आहेत. पाच रुपयाच्या डेली परवाण्यावर हा सगळा खेळ दुकानदार आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्यासहमतीने केला जातो. आणि याच ठिकाणी अधिकारी आणि दुकानदार यांची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत आहे. 
तालुक्यात मागील काही दिवसात तीन लाख रुपये हप्ता मागण्याची घटना चर्चेत आली होती. याचे मुळात कारण या ठिकाणी बुट्टी बोरी व वर्धा मार्गे अवैध दारू येत असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यामुळे प्रति पेटी मागील नफ्यावरून  कमिशन मागल्या गेले होते. मात्र संबंधित कार्यालयाने आपल्यावर बाजू येतात हे प्रकरण तिथेच दडपले होते. यानंतर गुप्तपणे राजरोजपणे हा व्यवसाय सुरूच आहे.

त्यामुळे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी लक्ष देऊन हृया अवैध चालणाऱ्या  काळ्या धंद्यांवरती तोडगा काढावा अन्यथा अशा बहुतांश बार व दुकानाचे परवाने रद्द करावे अशी मागणी जनतेतर्फे करण्यात येत आहे.
जीआर लिकर (Goods and Services Tax, GST) नियमांची अनुपालन करण्यात अत्यंत महत्वाचे आहे,

 खासगीत व्यापारी आणि विक्रेत्यांसाठी. खासगीतपणे, GST अधिनियम 2017 यानुसार विविध स्वरूपांतील व्यापारांची करण्यात येते. त्याच्याशिवाय, GST नियमांचा कायमातीत अनुसरण अनिवार्य आहे, 

ज्याचा पालन आणि प्रमाणीकरण समजून घेण्यात आवश्यक आहे:GST पंजीकरण: व्यापारासाठी GST पंजीकरण करणे अनिवार्य आहे, 
ज्याचा अर्थ असा की व्यापार करायला विनामूल्य विक्रेते किंवा वस्तुवाहक असावा.
GST बिलिंग: सर्व विक्रेत्यांनी ग्राहकांकडून GST बिलिंग करणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये विक्रेत्यांच्या GST पंजीकृत नंबरची साहित्य करावी लागेल.
GST रक्कमाची व्यवस्था: GST कलकूलेशन संबंधित व्यापारांसाठी सुरक्षित करायला आणि ग्राहकांना शोधलेल्या GST रक्कमाच्या सही व्यवस्थापनाची तुमची विशेष जिम्मेदारी आहे.
GST रिटर्न्स: मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक GST रिटर्न्स समयानुसार भरणे आवश्यक आहे. यावर GST निर्धारित समयावर बारंबार स्थितिसारखी माहिती आवश्यक आहे.
GST ऑडिट आणि संवर्धन: व्यावसायिक स्तरावर GST ऑडिट केल्यानंतर व अनुसंधान केल्यानंतर संवर्धन केल्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या GST प्रणालीचा सुरक्षित प्रमाण आणि पारदर्शक असलेली सुनिश्चिती आहे.
जीआर लिकर नियमांचे उल्लंघन गंभीर परिणाम असू शकतात, त्याचे ठरविण्यात आपले व्यवसाय आणि संचालन क्रम सुरक्षित आणि कायद्यानुसार असणे आवश्यक आहे.

Comments

Post a Comment