चंद्रपूर, दि. 26 : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय तपासणी समितीने शासकीय मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, शासकीय मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह आणि महिला विकास मंडळ द्वारा संचलित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना येथे भेट दिली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत वरील तिनही बालगृह चालविल जात असून उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे सदर तपासणी करण्यात आली. यावेळी बालकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, आरोग्य विषयक काळजी, स्वच्छता, जेवणाची सुविधा व गुणवत्ता, समुपदेशन सेवा, दैनंदिन लागणाऱ्या वस्तु आदी विषयी संस्थेच्या पदाधिका-यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात आली. याव्यतिरिक्त्त काही मदत लागल्यास किंवा काही अडचण असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर, येथे माहिती देण्यास सांगितले. जिल्हास्तरीय तपासणी समितीने जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत बालगृह विषयी माहिती पोहचवणे व जनजागृती करणे बाबत सुचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसिलदार प्रियंका मानकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ क्षमा बासरकर, मनोविकृती तज्ज्ञ संदीप भटकर, मानसोपचार तज्ज्ञ प्रियंका मून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शशिकांत मोकाशे, दिवाकर महाकाळकर, प्रभावती मुठाळ, नंदा अल्लूरवार, निलेश जक्कुलवार, हेमंत कोठारे, अभिषेक मोहूर्ले आदी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment