https://www.faktbatmi.com/2024/06/blog-post_34.html
नरेंद्र जिवतोडे यांची साखर कारखाना प्रशासनावर संचालक पदी नियुक्ती.
वरोरा
चेतन लुतडे
आज दिनांक 28 6 2024 ला मानस इंडस्ट्रीज नागपूरचे वतीने साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने नरेंद्र जिवतोडे यांची साखर कारखाना प्रशासनावर संचालक पदी नियुक्ती करण्यात आली ८ डिसेंबर 2023 ला वरोरा येथे भव्य शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले त्या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची उपस्थिती होती त्या परिषदेमधील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊस लागवड क्षेत्र वाढू शकते व विदर्भामध्ये उसाचे उत्पादन फार चांगल्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भामध्ये सुद्धा उसाच्या माध्यमातून शेतकऱ्याची प्रगती करता येईल का हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी कारखाना प्रशासनावरती नरेंद्र जिवतोडे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे .आज सर्व अधिकारी नियुक्तीचे पत्र घेऊन नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतावर येऊन नियुक्तीचे पत्र व सन्मान करण्यात आलेला आहे ह्या नियुक्तीमुळे वरोरा भद्रावती परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment