आनंदवनात मुलीची निर्घुण हत्या *.वरोरा पोलिसांचे यश *हत्ते प्रकरणातील आरोपी 24 तासाच्या आत गजाआड

आनंदवनात  मुलीची निर्घुण हत्या .

वरोरा पोलिसांचे यश 
हत्ते प्रकरणातील आरोपी 24 तासाच्या आत गजाआड

वरोरा 27/6/24
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील आनंदवन  परिसरात एका 24 वर्षीय मुलीची हत्या झाल्याने  या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरात राहणाऱ्या चंद्रवंशी कुटुंबातील आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 हिचा बुधवारी राहत्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. 
आई वडील दिगंबर चंद्रवंशी अपंग असून सेवाग्राम येथे दवाखान्यात गेले होते. मुलगी एकटीच असल्याने संध्याकाळी ते स्वगावी आनंदवनला वापस आले. यानंतर मुलगी आरती आपल्या घरात दिसत नसल्याने परिसरात विचारणा केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही. यानंतर काही वेळानंतर वडील दिगंबर  बाथरूम मध्ये गेले. त्यांना अस्पष्ट दिसत असल्याने  त्यांचा पाय  अटकून बाथरूम मध्ये  मुलीच्याच अंगावर सरळ पडले. यानंतर भयभीत झालेल्या वडिलांनी परिसरातील लोकांना सांगितल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.

 आरोपींनी धारदार शस्त्राने आरतीच्या मानेवर सहा सात वार करत ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
यानंतर वरोरा पोलिसांनी पंचनामा करीत संभावित आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. घटनास्थळी सध्या  कुठलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हातात गवसला नव्हता. 

मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे लग्न झालेले होते. मात्र दिवाळीपासून मुलगी आनंदवन येथच राहत होती. या संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार वरोरा यांनी  या संबंधात कसून चौकशी केली असून संशयित ठिकाणी पोलिसांचा गराडा लावण्यात आला होता.

दिनांक 26/06/2024 रोजी आनंदवन वरोरा येथे  आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 वर्ष राहणार वरोरा हिचा खूण झाल्याबाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार प्राप्त झाल्याने अप.क्रमांक 518/2024 कलम 302 भादवी नुसार अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 वरोरा पोलिसांनी तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे गुरुवारी 27 तारखेला संध्याकाळपर्यंत 24 तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी  समाधान माळी वय 26 रा.चोपडा, जळगाव ह. मु. वरोरा आनंदवन दवाखाना याला ताब्यात घेऊन, विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. 

हत्येचे कारण 

आरोपी आनंदवनात उपचारासाठी  आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.

आनंदवणाच्या या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले असल्याचे कळले , 6 महिने दोघेही प्रेमात होते, मात्र त्यानंतर आरती चे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले असल्याची माहिती मिळाली. या हप्तेचे गुढ वरोरा पोलिसांनी 24 तासाच्या आत शोधून काढले.

सदर कारवाई श्री. मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या दोन टीम च्या सहकार्याने, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.

*****************
आनंदवन हे ठिकाण सुरक्षित राहण्यासाठी गेटवरती सुरक्षा यंत्रणा लावलेली असते. बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले आहे. आनंदवन येथील कारभार पाहण्यासाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे. संधी निकेतन या भागात अंध अपंग विद्यार्थी खेळत असल्याने बऱ्याच ठिकाणी प्रतिबंध सुद्धा लावण्यात आलेला आहे. अशा सुरक्षित ठिकाणी 24 वर्षीय महिलाची हत्या झाल्याने या परिसरात असुरक्षिततेची  भावना महिलांमध्ये निर्माण झाली आहे.

***************


Comments