मनोरुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा... शहरातील मनोरुग्णांना स्वच्छ करून त्यांच्या घरी पोहोचवून देणारे किशोर डुकरे खरा सामाजिक वसा जपतात .
शहरातील मनोरुग्णांना स्वच्छ करून त्यांच्या घरी पोहोचवून देणारे किशोर डुकरे खरा सामाजिक वसा जपतात .
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा तालुक्यातील आसाळा गावात जन्म घेतलेला शेतकरी पुत्र किशोर डुकरे तालुक्यातील शेतकरीच्या समस्या घेऊन अनेक वर्षा पासून लढा देत आहे. शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसून त्यांच्या विविध मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेताल्या. या त्यांच्या सामाजिक कार्याला लोकांनी सलाम केला असून नुकतेच वरोरा शहरातील मनोरुग्णांना मदत करून सामाजिक बांधिलकी त्यांनी जपत आहे.
मागील बराच काळापासून किशोर डुकरे यांचा हा नित्यक्रम झाला असून शहरातील मनोरुग्णांना स्वच्छ साफ करून त्यांच्या आरोग्याची दखल घेत पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या घरी वापस पोहोचवेपर्यंतची सेवा ते देत आहे.
चिमूर येथील दिव्यवंदना आधार संस्था यांच्या सोबत वरोरा शहरातील मनोरुग्ण शोधून यांची अंधोळ, दाडी, कटिंग करून नवीन कपडे देऊन आरोग्याची तपासणी केली जाते. आवश्यकता भासल्यास त्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते .यानंतर त्या मनोरुग्णांना औषधी देऊन पूर्णतः बरे झाल्यानंतर ओळख पटल्यानंतर त्यांच्या स्वगावी त्यांच्या नातेवाईकाकडे पोहोचविल्या जाते. यानंतर नातेवाईक सुद्धा त्यांना पाहून आश्चर्यचकित होतात. घरचा एखादी व्यक्ती हरवल्यानंतर वापस आल्याचा जो आनंद असतो तो त्यांच्या चेहऱ्यवर झळकत असतो याच आनंदात किशोर डुकरे यांनी आपला आनंद मानला असून हे सामाजिक कार्य ते गेल्या कित्येक दिवसापासून करीत आहे.
मनोरुग्णांच्या सेवेला ते ईश्वर सेवा समजून गेल्या कित्येक वर्षापासून हे कार्य सतत करीत आहे या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाला समाजातर्फे सलाम....
Comments
Post a Comment