*आनंदवनातील तरुणीच्या खुनाचा आरोपीने पोलीस कोठडी मध्येच केली आत्महत्या* *प्रकरणाचा तपास सीआयडीच्या सुपूर्द**दोन पोलीस कर्मचारी निलंबित*

*आनंदवनातील तरुणीच्या खुनाचा आरोपीने पोलीस कोठडी मध्येच केली आत्महत्या* 
*प्रकरणाचा तपास सीआयडीच्या सुपूर्द*
*दोन पोलीस कर्मचारी निलंबित*

वरोरा : शाम ठेंगडी 
          वरोडा तालुक्यातील आनंदवन येथिल 24 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीने  पोलीस लॉक मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. 
.   आरती चंद्रवंशी यांचे वडील

        आनंदवनातील आरती नामक तरुणीच्या खुना संबंधात ताब्यात घेण्यात आलेल्या समाधान माळी या वीस वर्षीय युवकाने पोलीस लोक अप मध्येच बुटाच्या लेसने गळफास लावून आत्महत्या केली असून या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात आला असून प्रारंभिक  तपासात या  दोषी असलेल्या लॉकअप गार्ड व कर्तव्यावर असणारे अधिकारी या दोघांना त्वरित निलंबित करण्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  मुमक्का सुदर्शन यांनी आज 30 जूनला दुपारी पत्रकारांना दिली.
                  आरतीचा खून करण्यापूर्वी समाधान माळी याने तिच्यावर बलात्कार केल्याचे ही मान्य केले होते अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.
     आनंदवनात 40 वर्षापासून कार्यरत असणारे दिगंबर चंद्रवंशी यांची आरती ही मुलगी होती. बुधवार २६ जूनला दिगंबर आणि त्यांची पत्नी दोघेही सेवाग्राम येथे दवाखान्यात सकाळी गेल्या नंतर आरती ही घरी एकटीच होती. आरती एकटी असल्याचा फायदा घेत समाधान माळी हे आनंद वनातील तिच्या घरी गेले व त्यांने तिच्यावर त्यांनी बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. 
      या घटनेची तक्रार वरोडा पोलीस स्टेशनला होताच पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी समाधान माळी यास जेरबंद केले होते.
.  आरोपी   समाधान माळी ,आनंदवन
     समाधान माळी हा कुष्ठरोगी असून उपचारासाठी दीड वर्षांपूर्वीच आनंदवनात आला होता.समाधान माळी  याचे यादरम्यान दिगंबर चंद्रवंशी यांच्याकडे येणे जाणे असल्याने त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु समाधान ने आरती समोर ठेवलेल्या लग्नाचा प्रस्ताव तिने नाकारला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे आरतीला संपवण्याचा समाधानाने निर्णय यापूर्वीच घेतला असल्याचे त्याच्या कृतीवरून लक्षात आले. यासाठी त्याने फ्लिपकार्ट वरून मार्च महिन्यातच चाकू खरेदी केले होते.
मृतक- आरती चंद्रवंशी राहणार आनंदवन

       आई-वडील 26 जूनला सेवाग्रामला केल्याची संधी साधून त्याने आरतीला संपवले.परंतु त्यापूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे त्याने अटक केल्यानंतर कबुली दिली होती.पोलिसांनी समाधान ला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास सात दिवसाची म्हणजे 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.यामुळे त्याला काल पोलीस स्टेशन मधील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले असता तो आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असल्याचे म्हणत होता. त्याच्या वागणुकीतून तो केलेल्या कृत्याबद्दल दुःखी असल्याचे स्पष्ट होत असल्याचे  माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
             आज सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी समाधान माळी याने काही क्षणासाठी लॉकअप गार्ड नसल्याची संधी साधत लॉकअप समोर असलेल्या बुटाची लेस काढली व लॉक अप मधील बाथरूमच्या हुकला लेस अडकवून या लेसला  गळफास लावून घेत त्याने आपली जीवन यात्रा संपवली.
     या प्रकरणी दोषी असलेले लॉकअप गार्ड व कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत असून या संबंधी जबाबदार असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यास सोडण्यात येणार नसल्याचे त्यांचेवरही कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही देत या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी पत्रकारांना दिली.

              खून प्रकरणातील आरोपी समाधान माळी याने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्यानंतर येथील न्यायाधीश ,तहसीलदार, नायक तहसीलदार व व इतर महसूल विभागाच्या अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या उपस्थितीत  घटनेचा पंचनामा करण्यात आला. यानंतर शव पोस्टमार्टम साठी चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.या शवाचे चंद्रपूर येथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यातर्फे सीसीटीव्हीच्या निगराणीत पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.
एक मात्र खरे की पोलीस लॉकअप मध्ये आरोपीने आत्महत्या केल्याची वरोडा येथील ही पहिलीच घटना असून  या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे.
******************


Comments