कृषीपंपाचे ५०% वीज बिल माफ करा व नवीन वीज जोडणी त्वरित द्या: किशोर टोंगे यांची देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*कृषीपंपाचे ५०% वीज बिल माफ करा व नवीन वीज जोडणी त्वरित द्या:  किशोर टोंगे यांची देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे मागणी* 

वरोरा.
          राज्यातील शेतकऱ्यांना नेहमी अस्मानी संकटाबरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या वर्षी देखील विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी झाली असून त्यासोबत कापूस, धान,इ. मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे.

आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता कृषीपंपाचे वीज बिल अनेक शेतकऱ्यांना हजारोच्या घरात आलेली आहेत. आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना त्याची पूर्ण वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. 

त्यामुळे शासन स्तरावर आढावा घेऊन ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसेच शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी साठी दोन ते तीन वर्षापासून अर्ज केलेले आहेत, डिमांड देखील भरलेले आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध करावी याबाबत आपले स्तरावरून आदेश व्हावेत.

या मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पक्ष वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Comments