*हा आघाडीच्या कार्यकर्त्यांचा व मतदारांच्या विश्वासाचा विजय : खा. प्रतिभा धानोरकर**भद्रावती येथे विजयी रॅलीसह भव्य जाहीर सभा*

*हा आघाडीच्या कार्यकर्त्यांचा व मतदारांच्या विश्वासाचा विजय : खा. प्रतिभा धानोरकर*

*भद्रावती येथे विजयी रॅलीसह भव्य जाहीर सभा*
 
अतुल कोल्हे भद्रावती :

जाहिरात
. Happy birthday 

                   एवढ्या मोठ्या व्यापक असलेल्या लोकसभा क्षेत्रात महाविजय मिळविणे सहज शक्य नव्हते. मात्र महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत व मतदार संघातील मतदारांचा विश्वास या बळावर हा प्रचंड विजय मिळवणे सहज शक्य झाले. हा विजय माझा नसून तो महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर -वनी -आर्णी लोकसभा मतदार क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. भद्रावती येथील डॉ. आंबेडकर चौकात आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रतिभा धानोरकर, वच्छला धानोरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भास्कर ताजने, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावार,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर,काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सरिता सूर, संध्या पोडे, रेखा कुटेमाटे, प्रफुल चटकी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची ढोल -ताशांच्या निणादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य विजयी रॅली काढण्यात आली. सदर रॅली डॉ. आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचे भव्य जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांतर्फे प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकून महा विजय मिळवून दिला त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, मतदार संघाच्या संतुलित विकासाबरोबरच भद्रावती शहर तथा तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासनही प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिले. सभेचे प्रास्ताविक प्रशांत काळे यांनी, संचालन सुरज गावंडे यांनी तर आभार लक्ष्मण बोढाले यांनी मानले.सभेच्या यशस्वितेसाठी प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, प्रविण महाजन,आकाश ढवस,वंदना धानोरकर, ज्योती मोरे, कविता सुफी, लता इंदुरकर, मणीषा ढुमने आदिंनी सहकार्य केले.

जाहिरात


Comments