अतुल कोल्हे भद्रावती :-
आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भीम आर्मी पक्षाचे चीफ चंद्रशेखर आजाद हे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून विजयी झाले व त्यांच्या रूपाने भीम आर्मी पक्षाने लोकसभा निवडणुकीत आपले खाते उघडले.याचा आनंदोत्सव भद्रावती येथील भीम आर्मी तर्फे शहरातील डॉ. आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विजयाच्या घोषणा देत बँडच्या निनादात भीम आर्मीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भद्रावती भीम आर्मीचे शंकर मुन, मिलिंद शेंडे, राजरतन पेटकर,अनवर शेख, निशांत मेश्राम, नागेश फुलझेले, राज मेश्राम, आदर्श मेश्राम, राजू गावंडे, रमाकांत मेश्राम, वैभव पाटील, संकेत चिमूरकर, अतुल पाटील, थॉमस दुधे, राजु सपकाळ, सुमेध घुटके, स्वप्निल बनकर, मंगेश पवार, चंदन वाडेकर, लताताई देवगडे, प्राची वेलेकर, भाग्यश्री पवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment