एम्टा कोळसा खान कंपनीच्या मुख्य अभियंत्यास थापड मारल्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल**प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांचा समावेश*
*एम्टा कोळसा खान कंपनीच्या मुख्य अभियंत्यास थापड मारल्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल*
*प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांचा समावेश*
अतुल कोल्हे भद्रावती :-
दिनांक १९ रोज बुधवार ला बरांज येथील कर्नाटका एमटा कोळसा खान कंपनीत काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनादरम्यान कर्नाटक एम्टा कंपनीचे अधीक्षक ( मुख्य ) अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारल्या प्रकरणी भद्रावती पोलिसात दिनांक 19 रोज बुधवार ला रात्रो आठ वाजता प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांवर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बरांज येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या घेऊन काँग्रेस तर्फे खा. प्रतीभा धानोरकर यांच्या नेतृत्वात सदर कंपणी परिसरात आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनादरम्यान खासदार प्रतीभा धानोरकर यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी कंपणी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना सदर आंदोलनकर्ते हे आक्रमक झाले व या आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या कंपनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत कंपनीचे अधीक्षक मुख्य अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारली. त्यानंतर या प्रकाराची तक्रार यश शिवाप्रसाद यांनी भद्रावती पोलिसात केली. त्यानुसार सदर आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment