भुमी अभिलेख विभागाच्या सरळसेवा भरती 2021 ची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द**Ø कागदपत्र पडताळणी 15 जुलै रोजी*

*भुमी अभिलेख विभागाच्या सरळसेवा भरती 2021 ची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द*

*Ø कागदपत्र पडताळणी 15 जुलै रोजी*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि.12 : उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संर्वातील रिक्त पदे करण्याकरीता 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादीवर काही उमेदवारांचे आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, यांच्याकडील प्राप्त निर्देशान्वये नागपूर विभागातील 28 जून 2024 रोजीची सुधारित प्रतिक्षायादी  रद्द करण्यात आली असून 8 जुलै 2024 रोजी सुधारित प्रतिक्षायादी  प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रादेशिक निवड समितीने कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांमधून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीतील नेमणुक दिलेले, मात्र नेमणुकीनंतर राजीनामा  दिलेले व निवड रद्द केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने, उमेदवारांची प्रर्वगनिहाय सुधारीत प्रतिक्षायादी 28 जून 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र यावरही आक्षेप अर्ज प्राप्त झाल्याने आता सुधारीत प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपसंचालक भूमि अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांचे कर्यालय, जुने सचिवालय ईमारत, खोली क्रमांक 17 ,सिव्हील लाईन्स, नागपूर येथे होणार आहे.

कागदपत्र पडताळणी/तपासणीकरीता उमेदवारांनी 15 जुलै 2024 रोजी उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया ,चंद्रपूर, गडचिरोली  यांच्या नोटिस बोर्डवर, तसेच उपसंचालक भूमि अभिलेख नागपूर प्रदेश, नागपूर यांच्या कार्यालातील नोटीस बोर्डवर, आणि जिल्हा  अधिक्षक भूमि अभिलेख, नागपूर, वर्धा, भंडारा गोंदिया,चंद्रपूर व  गडचिरोली कार्यालयातील नोटीस बोर्डवर  दर्शनी भागावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे भुमि अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी कळविले आहे.

००००००

Comments