27 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार मतदार यादी**Ø मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर*

*27 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार मतदार यादी*

*Ø मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि.29 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत पूर्व – पुनरिक्षण उपक्रम राबविणे, 2 ऑगस्ट 2024 रोजी छायाचित्र मतदार यादीस प्रारुप प्रसिध्दी देणे, 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती दाखल करणे, निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करणे यांचा समावेश आहे.

तसेच 26 ऑगस्ट 2024 पर्यंत प्राप्त दावे व हरकती निकाली काढणे, मतदार यादी दोषरहित ठेवण्याकरीता आवश्यक बाबींची तपासणी करणे आणि अंतिम प्रकाशनासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे तसेच माहिती अद्ययावत करून मतदार यादीची छपाई करणे प्रस्तावित आहे. 27 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.

०००००

Comments