अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.
अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.
चेतन लुतडे
भद्रावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी, नाले, तळे, भरगच्च भरून वाहू लागले आहे. होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून, शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टी द्वारा करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करून नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही उदाहरणात ओसवाल, विक्रांत, इ. शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे. या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.
सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नदी, नाले, तलाव, तुडुंब भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणीदेखील साचून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेले आहे. त्यामुळे भद्रावती तालुका हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित विकास गजभे, भारत बेलेकर, सूरज शाहा सुमित हस्थक यांनी केली आहे.
Comments
Post a Comment