चक्क जिल्हा परिषद शाळाच दिली 7 वर्षासाठी भाड्याने.**आम आदमी पार्टी ने समोर आणला गंभीर विषय.*

*चक्क जिल्हा परिषद शाळाच दिली 7 वर्षासाठी भाड्याने.*
*आम आदमी पार्टी ने समोर आणला गंभीर विषय.*

वरोरा 

दि. 11/07/2024 रोजी वरोरा तालुक्यातील बोर्डा गाव येथे चक्क जिल्हा परिषद ची शाळाच गेल्या 7 वर्षा पासून भाड्याने दिलेली आहे अशी माहिती आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा - भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना मिळाली. तेव्हा बोर्डा येथे आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक पाहणी करण्यासाठी गेले व तिथे आधळले की गेल्या 7 वर्षा पासून  जिल्हा परिषद शाळा किरायाने एका डेकोरेशन वाल्याला देण्यात आले आहे. तिथे डेकोरेशन चे समान जसे जनारेटोर, खुर्च्या, लाकडी वस्तू व इतर काही वस्तू आढळल्या. 
या विषयी चौकशी करण्या करिता शाळेत गेले असता तिथे आढळले की एक दहावीत असलेला नाबालीग मुलगा तिथे गैररीत्या शिकवायला येत होता. या संपूर्ण विषयाची जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापिका मॅडम शाळेत अनुपस्थित असल्यामुळे यांना जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी दूरध्वनी द्वारे विचारणा केली असता माहिती उघडकीस आली की, बोर्डा येथील इंगळे नामक व्यक्तीला गेल्या सात वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा हे 2100 रूपये प्रति महिना भाड्याने किरायाने देण्यात आले आहे. व ही बाब BDO साहेब यांना माहिती असून, गैर प्रकारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ. उषा इंगळे यांनी बेकायदेशीर ठराव घेऊन आपल्याच नातेवाईकाला बळजबरीने शाळा किरायाने दिली आहे व गेल्या सात वर्षांपासून हे धंदा सुरू आहे. या प्रकरणात गटशिक्षण अधिकारी चहारे साहेब यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की त्या इंगळे नामक व्यक्तीला आम्ही शाळा खाली करायला सांगितलं आहे परंतु त्याचा मागे राजकीय पक्षांचा पाठबळ असल्यामुळे ते बळजबरीने शाळा खाली करत नसल्यामुळे आम्ही उपाययोजना करून लवकरच त्या व्यक्तीला बाहेर काढू असा वक्तव्य केला आहे. लवकर उपाययोजना करून त्या वर कार्यवाही करा अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करू असा रोष आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी व्यक्त केले.

Comments