*माजी नगरसेवक विनोद वानखेडे यांचेवर हल्ला**नागपूर चंद्रपूर महामार्ग येथील कोंढा फाट्यावरील घटना*


*माजी नगरसेवक विनोद वानखेडे यांचेवर हल्ला*

*नागपूर चंद्रपूर महामार्ग येथील कोंढा  फाट्यावरील घटना*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
                 भद्रावती नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनोद वानखेडे यांच्यावर एका व्यक्तीने लोखंडी राडच्या सहाय्याने हल्ला केला यात ते जखमी होऊन त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. सदर घटना दिनांक 27 रोज गुरुवारला रात्रो अकरा वाजताच्या दरम्यान शहरा नजीक असलेल्या कोंढा  फाट्यावर घडली. वानखेडे यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी हा एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकवर ड्रायव्हर असल्याचे कळते. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली असून या आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते सदर आरोपीच्या शोधात आहे. विनोद वानखेडे यांचे कोंढा फाट्यावर चहाचे हॉटेल आहे. सदर आरोपी त्यांच्याकडे उधारीवर सामान मागायचा. त्यांनी त्याला उधारीवर माल न दिल्याने तो राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.

Comments