*नवनियुक्त जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजुरा विधानसभा तर्फे सन्मान स्वीकारुन व राजुरा विधानसभेची राजुरा, गोडपिपरी, कोरपना व जिवंती तालुका व शहर आढावा बैठक संपन्न*
*नवनियुक्त जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजुरा विधानसभा तर्फे सन्मान
राजुरा विधानसभेची राजुरा, गोडपिपरी, कोरपना व जिवंती तालुका व शहर आढावा बैठक संपन्न*
राजूरा
राजुरा विधानसभा क्षेत्रात राजुरा, कोरपणा, जिवती व गोंडपिपरी असे चार तालुके असून एकुण 12 जिल्हा परीषद गण व 26 पंचायत समिती गट असून सर्व विधानसभा क्षेत्राची पक्ष बांधणी, शिवसैनिकांना एकजुट करणे, एकमेकासोबत समन्वय ठेवून प्रत्येक शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभाग घेवून त्यांच्या समस्या व मागण्या समजावून घ्याव्या, त्या समस्या व मागण्या निकाली काढण्याचा सतत प्रयत्न करावा. या कार्यातून शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा याकरीता जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन करण्याकरीता आढावा बैठकीत सर्व उपस्थित शिवसैनिकांना आवाहन केले. सदर बैठकीत शिदे गटाचे उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपचायत बामणवाडा सदस्य प्रफुल्ल चौधरी, केशव वाढरे उपतालुका यांनी पक्षप्रवेश घेतला.
Comments
Post a Comment