भद्रावती-वरोऱ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सेवा केंद्राचे उद्घाटनभाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांचा पुढाकार
भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांचा पुढाकार
वरोरा
वरोरा- महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा अर्ज भरत असतांना महिलांना योग्य अशी मदत आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीचे ७५- भद्रावती-वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांच्या पुढाकारातून भद्रावती आणि वरोरा शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी निःशुल्क सेवा केंद्राचे उद्घाटन भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
जाहिरात
ऑनलाईन सबंधित सर्व कामांसाठी या निःशुल्क सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ वरोरा - भद्रावती तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे भद्रावती - वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment