*महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून तहसील कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन*

*महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून तहसील कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                  लाक्षणिक संप करूनही राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष न दिल्याने अखेर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या भद्रावती शाखेतर्फे येथील तहसील कार्यालयात दिनांक 15 रोज सोमवारला सकाळी साडेदहा वाजता पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या संपामुळे भद्रावती तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावत झालेले आहे. या आंदोलनात भद्रावती तालुक्यातील नायब तहसीलदारांसह 21 महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेतर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्र महसूल अहर्ता  परीक्षा नियमातील तरतुदीनुसार सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात यावी, महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीची अधिकार प्रदान करण्यात यावे, अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी, अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शासनापुढे ठेवण्यात आल्या  आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या या मागण्या शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासन या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून केला आहे. संघटने कडून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष  करण्यात आल्याने प्रथम लाक्षणिक संप व आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Comments