अतुल कोल्हे भद्रावती -
तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगाराला बेलोरा येथील एका युवकाने वाद घालून मारहाण केल्याची घटना दि. १२ जुलै शुक्रवारला दुपारी २.०० वाजताचे दरम्यान घडली. याप्रकरणी त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्वल प्रवीण बांदुरकर अरबिंदो कंपनी असे तक्रार कर्त्याचे नाव आहे. तर विलास परचाके वय ४८ राहणार बेलोरा असे मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अरबिंदो खुल्या कोळसा खाणीचे अधिकृतरित्या या परिसरात काम चालू आहे. त्याकरता जिल्हा परिषद रस्त्याने कंपनीची वाहतूक होत असते हेच कारण पकडून विलास परचाके हा गेल्या काही दिवसापासून कंपनी परिसरात येऊन वाद घालत होता दिनांक १२ रोज शुक्रवारला येथील कामगार प्रज्वल बांदुरकर याचेशी वाद घालून मारहाण केली. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment