साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक गावाचा संपर्क तुटला

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक  गावाचा संपर्क तुटला

वरोरा 
  दिनांक १९/७/२०२४ ला झालेल्या मुसळधार पावसा मुळे मौजा साखरा येथील मार्गांवरील पुलाचे काम अर्धवट काम केले अल्यामुळे पुल वाहुन गेला सदर रहदारी साठी नागरिकांना सर्घष करावा लागत आहे.

      वरोरा तालुक्यातील साखरा -आब वडगाव ते कोरा जाणाऱ्या मार्गांवर पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तसेच पी डब्लू. डी. ची निष्काळजीपणा मुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुले पुलाला लागून असलेल्या सीडी वरुन पूल पार करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे . मुसळधार पाऊस येत आहे परंतु जाणे येणेसाठी अर्धवट पूल अड्सर ठरला आहे. यामध्ये पि डब्लू डी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप साखरा ग्रा. प. चे माजी सरपंच दिनेश मोहारे यांनी केला आहे.

 ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसते त्यामुळे साखरा, आब वडगाव येथील नागरिकांना शेगाव,वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी  तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा जावे लागते तसेच शाळेच्या मुलाना शाळेत जान्या करीता कोनताही पर्याय नसल्या मुळे शिक्षण बंद झाले आहे. अनेक गावांना रहदारीसाठी जोडणारा रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराने निर्धारित वेळेत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुले नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे .

Comments