*पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा तीनशे वृक्षसंवर्धनाचा संकल्प*

*पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा तीनशे वृक्षसंवर्धनाचा संकल्प*

*सामाजिक बांधिलकी जोपासत पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे भद्रावतीत वृक्षारोपण*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना म्हणून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे संपूर्ण राज्यात नावलौकिक आहे. कणकवली येथे झालेल्या संघटनेच्या राज्यसभेतील ठरावानुसार संपूर्ण राज्यात संघटनेतर्फे 50 हजार वृक्षाचे रोपण करण्याचे उद्दिष्ट संघटनेने ठरविले आहे.  हाच धागा धरीत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीने    तालुक्यात 300 च्या वर झाडे लावण्याचे ठरविले आहे. या अभियानाची सुरुवात पंचायत समिती भद्रावती कार्यालयाच्या परिसरात  विविध वृक्षांची लागवड करून संघटनेने सामाजिक व पर्यावरण भावना जोपासली आहे. 
              याप्रसंगी पंचायत समिती भद्रावती चे गट विकास अधिकारी माननीय श्री आशुतोष सपकाळ साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करतांना साहेबांनी अशाच प्रकारे आपण आपल्या परिसरात व शाळेतही वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवून पर्यावरण पूरक कार्यक्रम घ्यावे असे आव्हान केले. पंचायत समिती परिसरात 25 विविध प्रकारच्या वृक्ष व फळझाडांची लागवड करण्यात आली ,यामध्ये प्रामुख्याने कडुनिंब, पिंपळ, सप्तपर्णी, गुलमोहर, आंबा, पेरू ,काजू, जांभूळ  इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मान. जलील शेख व मान. सौ सिद्धमशेट्टीवार मॅडम, केंद्रप्रमुख विद्ये यांनीही परिसरात वृक्षारोपण केले, तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही वृक्षारोपण करून झाडे जगवण्याचा संकल्प केला व  शाळेत एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबविण्याचे ठरविण्यात आले.
          या कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजू चौधरी, सरचिटणीस गणेश दुधलकर, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष जगदीश ठाकरे ,संचालक गंगाधर बोढे, राजीव कुटेमाटे, राहुल बिपटे, विलास कुळमेथे, दिनकर गेडाम, दिनेश ऊईके, प्रवीण बेलखुडे ,प्रणित गोरख, बंडू जुगनाके, श्रीरंग तुरारे, बाळू गुंडमवार , मधुकर वाटेकर ,दिलीप आस्वले ,सुभाष बोढाले, भाऊराव ठेंगणे, सुखदेव निरंजने ,कोरडे सर आदी  पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Comments