वरोरा येथील पूर्वेश वांढरे मृत्यू प्रकरण* *-**विदर्भ मल्टी सर्विसेस एजन्सीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नाही*

*वरोरा येथील पूर्वेश वांढरे मृत्यू प्रकरण* 

*विदर्भ मल्टी सर्विसेस एजन्सीकडे  शहराला  पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नाही*

*कंपनी संचालकांनी पत्र परिषदेत केला खुलासा*

 वरोरा 
 
           वरोरा शहरातील मालवीय वार्डातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे आणि हे  दूषित पाणी पिल्याने पूर्वेश सुभाष वांढरे या बालकाचा 5 जुलैला मृत्यू झाल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात व पोर्टलवर प्रकाशित झाले आहे. या वृत्तांत माझ्या विदर्भ मल्टी सर्विसेस या एजन्सीचं नाव वारंवार घेण्यात आले  होते. शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कंपनीकडे नसल्याने सदर वृत्त हे निराधार व खोटे असल्याचा खुलासा विदर्भ मल्टी सर्विसेस चे संचालक जावेद रजा यांनी एका पत्रकार परिषदेत केला. 

      वरोरा येथील  एका रेस्टॉरंट मध्ये आज 21 जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते कंपनीच्या कामाची माहिती कंत्राटदारांनी दिली.
 त्यावेळी ते बोलताना ते म्हणाले, वरोरा शहराला 2023 24 या आर्थिक वर्षासाठी वरोरा नगर परिषद पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था देखभाल व दुरुस्तीसाठीच विदर्भ मल्टी सर्विसेस या एजन्सीला कंत्राट मिळाले आहे.
         या अंतर्गत नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात देखभाल व दुरुस्तीची कामे  करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. या कंत्राटनुसार कंपनीकडे फिल्टर प्लांट,जॅकवेल येथील मोटार पंप दुरुस्ती, स्टार्टर पॅनल दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्ती, वॉल दुरुस्ती व विद्युत संबंधित कामे यासोबतच गावातील ट्यूबवेल दुरुस्ती करणे, त्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करणे इत्यादी कामे दिली आहेत. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सोर्सशी आमचा कुठलाही संबंध नाही.
     एजन्सीतर्फे मालवीय वार्डात दूषित पाणी पुरवठा होतो आहे  असे वृत्त प्रकाशित झाले ते खोटे असून शहराला होणारा पाणीपुरवठा शुद्ध की अशुद्ध हे माझ्या एजन्सी चे काम नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
  मालवीय वार्डात इतर  कुठल्याही घरी दूषित पाण्याचा पुरवठा झाला अशी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही.मालवीय वार्डातील केवळ दोन कुटुंबात अशा प्रकारची बाब समोर आली आहे. या वार्डात दूषित पाण्याचा पुरवठा झाला असता तर डायरिया झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असती असेही ते म्हणाले.
       वास्तविक मालवीय वार्डातील ही दोन कुटुंबे देवदर्शनासाठी बाहेर गेली होती. तेथून परत आल्यानंतर त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.वार्डात राहणाऱ्या इतर कुठल्याही व्यक्ती बाबत असे झाल्याचे ऐकीवात नाही व तशी तक्रारही  नसताना मात्र याबाबत माझ्या एजन्सीची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या गेल्याचे माझे मत आहे. अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित झाल्यामुळे माझी व माझ्या एजन्सीची  बदनामी झाली असल्याने मला व माझ्या कुटुंबावर मानसिक तणाव निर्माण झाला आहे असेही ते म्हणाले. 
        शहरातील  जलशुद्धीकरण प्रक्रियेशी व नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करणे याचेशी आपला व विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीचा कुठलाही संबंध नाही. तर केवळ पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत दुरुस्ती करणे एवढेच माझ्या एजन्सीचे काम आहे. वास्तविक आपण शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मध्ये लिकेज झाल्यास ते नवीन पद्धतीने आधुनिक पद्धतीने बंद करत आहोत. शिवाय मालवीय वार्डातील पूर्वेस वांढरे यांचा मृत्यू दूषित पाण्याने झाला हे अजून पर्यंत स्पष्ट झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

        त्यामुळे माझ्या व माझ्या एजन्सीबाबतचे जे वृत्त  पेपर व पोर्टलवर प्रसिद्ध झाले आहे. ते बिन बुडाचे आहे आणि माझ्यावर केलेले आरोप हे  खोटे आहेत. या संबंधात नगरपालिकेने एक चौकशी समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल व पूर्वेश वांढरे यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर आपण योग्य तो पाऊल उचलू असे ते म्हणालेत.
.      मालविय वार्डातील पाईपलाईन मधील कचरा

वरोरा शहरातील संपूर्ण पाईपलाईन ही2002 सालीच कालबाह्य झाली असल्याची माहिती मिळाली. या परिसरातील पाईप मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकून असल्याने बऱ्याच ठिकाणी कुजलेला पाईप काढून नवीन पाईप टाकावा लागत आहे. ड्रेनेज सिस्टमचे झाकण सुद्धा नागरिक काढून दुसरीकडे घेऊन जातात त्यामुळे या ठिकाणी कचरा साचतो. हे काम करणे इतके कठीण आहे की 100 वर्ष जुनी पाईपलाईन कुठून जाऊन आहे हे सुद्धा पालीकेला लक्षात नसेल. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा घटनेत वाढ होऊ शकते. याची दक्षता पालिकेने घेणे अत्यावश्यक आहे.
 
          कंत्राट प्रत 

Comments