कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देऊन न्याय द्यावा**भद्रावती कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

*कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देऊन न्याय द्यावा*

*भद्रावती कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती : 
              महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा मिळावा यासाठी तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे  निवेदन सुपूर्द केले.
   या निवेदनात कोतवाल हे पद महसूल विभागात स्वतंत्र पूर्व काळापासून अस्तित्वात आहे परंतु, अद्यापपर्यंत या पदाला चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा न देता अ वर्गीकृत कर्मचारी सेवा घेत असल्याने व सदर पदावरील कर्मचारी नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचान्याप्रमाणे महसूल विभागातील कामे करत असल्याने, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे व उपाध्यक्ष यादव यांची दि. ३ जुलै व१० जुलै रोजी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यासोबत बैठक पार पडली.यामध्ये तलाठी व लिपीक पदामध्ये २५% कोटा राखीव ठेवण्यात यावा,सेवा निवृत्त कोतवाल यांना पेन्शन व अनुकंप लागू करण्यात यावी,कोतवाल पदाचे नाव बदलवून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करण्यात यावे,सेवा निवृत्त कोतवाल यांना ३०० दिवसाचे रजा रोखीकरण देण्यात यावे,कोतवालमधून शिपाई पदावर देण्यात येणारा ४०% कोटा वाढवून तो ८०% करावा व ८ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार अटल पेन्शन बाबत सुधारीत जी.आर.काढण्यात यावा.या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.मात्र चर्चा होऊनही अद्यापही शासनाने दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी कोतवाल कर्मचारी सकारात्मक चर्चा झाली असली तरीही तहसीलदार यांनी आमचे निवेदन शासन पाठऊन शासन दरबारी पाठपुरावा करावा चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देऊन न्याय द्यावा असे निवेदन सुपूर्त करण्यात आले.यावेळी भद्रावती तालुका अध्यक्ष बंडू पारखी,सचिव दिलीप नागपुरे,विजय उईके,प्रकाश दुपारे,अशोक पेन्दोर,राहुल जंगम यासह इत्यादी कोतवाल संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments